Mira-Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकवटले, बंद पुकारत काढला मोर्चा

Last Updated:

Mira-Bhayandar Strike :व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सुरक्षेच्या मुद्यावर आज मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मोर्चा काढला. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केले.

मीरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकवटले, बंद पुकारत काढला मोर्चा
मीरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकवटले, बंद पुकारत काढला मोर्चा
मीरा-भाईंदर: मराठीच्या मुद्यावरून एका परप्रांतीय दुकानदार आणि फेरीवाल्याला मारहाण केल्यानंतर मनसेविरोधात मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी आज मनसे विरोधात मोर्चा काढला. व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सुरक्षेच्या मुद्यावर आज मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मोर्चा काढला. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत.
मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून आज मारहाणीच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, या चिंतेतून व्यापाऱ्यांनी जोरदार मोर्चा काढला. सेवेन स्कूल, मिरा रोड (पूर्व) येथून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध रॅली काढण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे आपले एक निवेदन दिले आहे.
advertisement

प्रकरण काय?

जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. ही बाब समजताच मनसैनिकांनी या दुकानदाराला जाब विचारला. मात्र, त्यावेळी देखील या दुकानदाराने मराठी न बोलण्याचा हेका कायम ठेवला होता. अखेर मनसैनिकांनी या दुकानदाराच्या कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
advertisement

राजकीय वातावरण तापणार?

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्याने या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे म्हटले जात आहे. मीरा-भाईंदर या भागात अमराठींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच आता अमराठी व्यावसायिकांनी शक्तिप्रदर्शन करत मोर्चा काढला. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते पक्षाची भूमिका मांडणार आहे.

यापूर्वीही झालेत मराठी-अमराठी वाद...

advertisement
मीरा-भाईंदरमध्ये यापूर्वी देखील मराठी-अमराठीचे वाद झाले आहेत. मासांहार करणाऱ्या मराठी माणसांना घरे नाकारणे, घरात मासांहारी पदार्थ शिजवल्याने मराठी माणसांना त्रास देणे, भांडणे करणे असे काही प्रकार यापूर्वी घडले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मराठी-अमराठी वाद झाले आहेत. त्यातच आता मराठीच्या मुद्यावर हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mira-Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकवटले, बंद पुकारत काढला मोर्चा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement