ST Workers Protest: एसटी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक सेवा विस्कळीत होणार? समोर आली अपडेट....

Last Updated:

ST Workers Protest : एसटी कर्मचारी संघटनांनी आपल्या आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.

ST कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक विस्कळीत होणार? अपडेट आली समोर
ST कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक विस्कळीत होणार? अपडेट आली समोर
मुंबई: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत आंदोलन करणार आहे. सरकारने आमच्या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न केल्याने एसटी कर्मचारी संघटनांनी आपल्या आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमा मिळाव्यात यासाठी एसटी मधील वेगवेगळ्या आठरा संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून प्रश्न आर्थिक स्वरूपाचे असल्याने अर्थ मंत्री व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली होती. पण राजकीय कारणामुळे ही बैठक अचानक रद्द करण्यात आली असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी कामगार संघटना कृती समिती सह अन्य दोन संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून त्यातील पहिले आंदोलन हे १३ तारीख रोजी म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग निघणे गरजेचे होते. मात्र, सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे कामगार संघटनांनी म्हटले.
advertisement
एसटीमधील वेगवेगळ्या 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीचे आंदोलन उद्यापासून आझाद मैदानावर सुरू होणार असून आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात आज कृती समिती मधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली व त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समिती मधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे,दादाराव डोंगरे, बंडू फड,संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड,विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे , विश्वनाथ जाधव,आदी पदाधिकारी उपस्थित होते. एसटी मधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होणार आहे.
advertisement

तर आंदोलन तीव्र होणार...

दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे असल्याचे मत एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले. सोमवारचे आंदोलन हे प्रातिनिधीक आंदोलन आहे. त्यामुळे एसटीच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बरगे यांनी म्हटले. सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहील असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले असल्याची माहिती श्रीरंग बरगे यांनी दिली.
advertisement

काय आहेत मागण्या!

2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Workers Protest: एसटी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक सेवा विस्कळीत होणार? समोर आली अपडेट....
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement