आई स्वयंपाक करत होती, बाळ खेळताना बादलीत पडलं, काही वेळाने पाहिलं, होत्याचं नव्हतं झालं...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nashik News: बाळ खेळत असताना अचानकपणे बादलीत पडले आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.
नाशिक : नाशिकच्या देवळालीजवळील रोकडोबावाडीत एका १० महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू झाला. खेळता खेळता बादलीत रोशन बादलीत पडला. त्याने हालचाल करायचा प्रयत्न केला. मात्र बादलीत जास्त पाणी असल्याने त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्याला श्वास घेणे कठीण झाले.
रोकडोबावाडीच्या मशिदीनजीक अजय तायडे राहायला आहेत. त्यांचे १० महिन्यांचे बाळ होते. त्यांची गृहिणी पत्नी घरातच स्वयंपाक करत असताना झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे बाळ बादलीत पडले.
रोशनला सांभाळता सांभाळता स्वयंपाक करू, असे म्हणून त्याची आई स्वयंपाक घरात गेली. रोशन खेळता खेळता बादलीजवळ गेला आणि त्याच बादलीत पडला. बाळ खेळत असल्याचे समजून आई स्वयंपाक पूर्ण करण्याच्या घाईत होती. काही वेळाने रोशन कुठे आहे, हे पाहण्यासाठी आई जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आली, त्यावेळी त्यांना रोशन दिसेनासा झाला.
advertisement
शेवटी त्यांनी पाण्याच्या बादलीत पाहिले, तेव्हा नाकातोंडात पाणी गेलेला रोशन त्यांना दिसून आला. त्यांनी रोशनला तत्काळ बिटको रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉ. उगले यांनी रोशनला मृत्यू घोषित केले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
आई वडिलांचा आक्रोश
रोशनचा बादलीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहेत. १० महिन्यांचे बाळ गेल्याने रोशनच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांना रडू कोसळले.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
June 06, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई स्वयंपाक करत होती, बाळ खेळताना बादलीत पडलं, काही वेळाने पाहिलं, होत्याचं नव्हतं झालं...