Nashik Accident : कारचा चक्काचूर, तीन जण ठार, नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Nashik News : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इगतपुरीतील हॉटेल ऑरेंजजवळ घडला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधून तिघांनाही बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला प्रयत्न करावे लागले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. वेगावर ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन जोरदार धडकली. या अपघातात वाहनातील तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी खर्डी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेमुळे इगतपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
50 फूट फरफटत नेले, मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
कामावरून घरी जाणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रामानंद घाट परिसरात ही दुर्देवी घटना घडली. मालवाहू वाहनाने दिलेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर असलेला तरुण 40-50 फूट फरफटत गेला. शहरातील रामानंद घाट परिसरात संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात नवजीवन कॉलनीतील स्वप्निल अशोक कापुरे (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 03, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Accident : कारचा चक्काचूर, तीन जण ठार, नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात