Jitendra Awhad : मी ओघात बोलून गेलो, वाद वाढवायचा नाही; आव्हाडांनी खेद व्यक्त करत दिलं स्पष्टीकरण
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
इतिहास लिहायला तो माहिती असायला लागतो. वाल्मिकी रामायणाबद्दल कुणाला आक्षेप आहे का? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
मुंबई, 04 जानेवारी : प्रभू श्रीराम मांसाहार करायचे या वक्तव्यप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. मात्र मी कुठलही भाष्य अभ्यासाशिवाय करत नसल्याचंही स्पष्ट केलं. काल मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. मला हा वाद वाढवायचा नाही. जे या विरोधात उभा राहिले त्यांच्यासाठी सांगतो आहे. वाल्मिकी रामायणात संदर्भ आहे. माझ्याकडे असलेली कागदपत्रे आताची नाहीत तर १८९१ मधली असल्याचंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
भारतातील अनेक लोकांनी पेपर पाठवले आहेत. रामायणातील संदर्भाचे त्या त्या काळात ट्रान्सलेशन केलं गेलं आहे. इतिहास लिहायला तो माहिती असायला लागतो. वाल्मिकी रामायणाबद्दल कुणाला आक्षेप आहे का? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, मी कुठलही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. मात्र आज अभ्यासाला नाही तर भावनेला महत्त्व आहे. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी खेद व्यक्त केला आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त करतो. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात असल्याचंही ते म्हणाले. तुमचा राम निवडणुकीच्या बाजारात, आमचा राम आमच्या हृदयात आहे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी विरोध करणाऱ्यांना सुनावले.
advertisement
अबुधाबीत बसून बोलणं सोपं
दरम्यान, राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून घरचा आहेर दिला गेल्याबद्दल त्यांना विचारले असता म्हणाले की, पक्षात मी एकटा पडलो असतो तर एवढी लोकं माझ्या मागे उभा राहिली असती का? रोहित पवारांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी रोहित पवार यांना मी फार महत्त्व देत नाही, ते अजून लहान आहेत. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. रोहित पवार काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. लढाई करताना माझ्यासोबत किती हे बघून उतरलो तर आयुष्यात लढाई शक्य नाही असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 12:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jitendra Awhad : मी ओघात बोलून गेलो, वाद वाढवायचा नाही; आव्हाडांनी खेद व्यक्त करत दिलं स्पष्टीकरण