धनंजय आणि मी पक्ष म्हणून एकत्र, बहिण भाऊ म्हणून नाही; ताटाला ताट लावून जेवणाऱ्या पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय आणि मी पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. धनंजय आणि मी पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे एकत्र आलो आहोत ,बहिण भाऊ म्हणून नाही असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. मुंडे बहिण भाऊ एकत्र येण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
advertisement
सध्या आमदार धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बऱ्याच वर्षानंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यात मुंडे बहीण भाऊ एकत्रीकरणाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे .या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे .आता धनंजय मुंडे या वक्तव्याला कसं घेतात हे पाहावं लागेल ,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
advertisement
राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजपला फरक पडणार नाही : पंकजा मुंडे
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडे म्हणाल्या, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला काही फरक पडणार नाही. राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता आहे .भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. एकत्र येण्यासंदर्भात उद्धव आणि राज ठाकरे निर्णय घेतील . मी या विषयावर बोलणे एवढी मोठी नाही.
advertisement
पांगरी गडावर बहीण भावाचे ताटाला ताट लावून जेवण
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पांगरी गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंनी 11 वर्षानंतर प्रथमच हजेरी लावली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांनी एकत्र जेवण केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंकजा मुंडे यांनी तुळजाभवानी मंदिरात राबवला उपक्रम
advertisement
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्ततेबाबत जनजागृती करत एक उपक्रम राबवला. त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली तसेच स्थानिक दुकानदारांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वाटून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती केली. तुळजापूर हे एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे होणारे प्रदूषण कमी करणे गरजेचे असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 07, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय आणि मी पक्ष म्हणून एकत्र, बहिण भाऊ म्हणून नाही; ताटाला ताट लावून जेवणाऱ्या पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य