Jalgaon News : जळगावात मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, अजितदादांच्या निकटवर्तीयाला केली अटक

Last Updated:

Jalgaon News : जळगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.

जळगावात मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, अजितदादांच्या निकटवर्तीयाला केली अटक
जळगावात मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, अजितदादांच्या निकटवर्तीयाला केली अटक
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. दरोडा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते विनोद देशमुख यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. २०२२ मध्ये दाखल झालेल्या दरोडा व जीव घेण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांनी ही कारवाई झाली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
advertisement
जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात व्यावसायिक मनोज वाणी यांच्या तक्रारीवरून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपानुसार, देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकला. तसेच जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. मात्र, या गुन्ह्यात गेली ३ वर्षं कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती.
advertisement

पीडिताच्या पत्रकार परिषदेनंतर कारवाई...

काही दिवसांपूर्वीच पीडित आणि तक्रारदार मनोज वाणी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट गंभीर आरोप केले होते. “अजित पवार यांच्या दबावामुळे पोलिस अटक करत नाहीत,” असा त्यांचा आरोप होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या अटकेला राजकीय छटा लाभली असून, जळगाव जिल्ह्यातील सत्तासमीकरणावर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : जळगावात मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, अजितदादांच्या निकटवर्तीयाला केली अटक
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement