तानाजी सावंत यांच्या लेकाची झाडाझडती, पुणे पोलिसांना उत्तर दिलं पण अडकला, प्रतिप्रश्न करताच हाताची घडी तोंडावर बोट!

Last Updated:

Pune Police Interrogation Hrishiraj Sawant: पुणे क्राईम ब्रँचने रात्री वाजेच्या दरम्यान रुषिराज सावंत आणि त्याच्या दोन मिञांचा जबाब नोंदवून घेतला.

ऋषिराज सावंत
ऋषिराज सावंत
चंद्रकांत फुंदे, पुणे : कौटुंबिक वादातून रुसून बँकॉकला गेलेला तानाजी सावंत यांचा बहाद्दर लेक वडिलांच्या राजकीय पॉवरमुळे यंत्रणांचा वापर करून पुण्यात सुखरुप परतला. तब्बल पाच तास संपूर्ण यंत्रणा तानाजी सावंत यांच्या लेकासाठी काबत होत्या. सर्वसामान्यांना हिडीसतुडूस करणाऱ्या पोलिसांनी सावंतांच्या एका फोनमुळे वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. ऋषिराज सावंत अपहरणनाट्याच्या ४ तासांनंतर म्हणजे रात्री ८ वाजून २० मिनिटांनी पुणे विमानतळावर लँड झाला.
ऋषिराज सावंत याच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आणि यंत्रणा कामाला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याने ऋषीराज सावंत यांची प्राथमिक चौकशी केली जाणार असून त्यांचा बँकाँकसाठीचा पुणे ते चेन्नई प्रवास जाणून घेतला जाईल,असे स्पष्टपणे सांगितले.
advertisement

पोलिसांकडून ऋषिराजची झाडाझडती, ऋषिराजचे अजब उत्तर

पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केली. ऋषिराज दोन मित्रांबरोबर पुण्यात उतरल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. कोणत्या कारणासाठी बँकॉकला गेला होता, उद्देश काय होता? घरात वाद झाला होता का? असे प्रश्न पोलिसांनी ऋषिराजला विचारले.
बँकॉकवारीचे कारण विचारल्यावर बिझनेस डिलसाठी बँकाकला चाललो होतो, असे अजब उत्तर त्याने पोलिसांना दिले. पण मग, जाताना वडिलांना का सांगितले नाही? असे पोलिसांनी विचारताच काही उत्तर न देता हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था त्याची झाली होती.
advertisement

दुबईला कशासाठी गेला होता?

पुणे क्राईम ब्रँचने राञी वाजेच्या दरम्यान रुषिराज सावंत आणि त्याच्या दोन मिञांचा जबाब नोंदवून घेतला. याआधी दुबईलाही बिझनेस डिलसाठीच गेलो होतो, असेही ऋषिराजने पोलिसांना सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर पुणे पोलिसांनी ऋषिराजला घरी सोडले. मुलगा सुखरूप घरी आल्याने अपहरणाचा गुन्हा तानाजी सावंत मागे घेणार का, असे विचारले जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तानाजी सावंत यांच्या लेकाची झाडाझडती, पुणे पोलिसांना उत्तर दिलं पण अडकला, प्रतिप्रश्न करताच हाताची घडी तोंडावर बोट!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement