Rohit Pawar : "खिशातला हात काढ आधी... गोट्या खेळत होता का?", रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Pawar Viral Video : कार्यकर्त्याने तक्रार केल्यानंतर भर मंचावर रोहित पवार यांनी अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली. त्यावेळी रोहित पवारांनी अधिकाऱ्याला दम देखील दिला.
Rohit Pawar Angry On Government Officer : शुक्रवारी कर्जतप्रमाणेच जामखेडमध्ये आमसभेच्या माध्यमातून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न केल्याचं पहायला मिळालं. पण या आमसभेत मोठा राडा झाला. एका कार्यकर्त्याने मांडलेल्या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार अधिकाऱ्यावर भडकले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रोहित पवार यांच्यावर टीका देखील होताना दिसत आहे.
आतापर्यंत गोट्या खेळत होता का?
एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यानंतर रोहित पवार भडकले. मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कानउघडणी केली. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापलं. पण त्यानंतर रोहित पवारांचा संताप अधिकच वाढला.
advertisement
तुमच्या बापाचा पैसा नाही
रोहित पवार यांना अधिकाऱ्याची एक वागणूक आवडली नाही. अधिकारी खिशात हात घालून उभा होता. त्यावेळी रोहित पवार यांनी आधी खिशातून हात काढ, असं म्हणत झापलं. तू लय शहाणा लागून गेलाय. इथं लोकं आलीत म्हणजे काम खराब झालं आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. काम चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. पण रोहित पवारांच्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
advertisement
लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करवून घेणे हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्यच आहे !
पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला भर सभेत अद्वातद्वा बोलणे ही कोणती पद्धत आहे ???!
ओ रोहित @RRPSpeaks पवार साहेब, तो शासकीय कर्मचारी आहे तुमच्या घरचा नोकर नाही अशा भाषेत बोलायला ! काम पटत नसेल तर… pic.twitter.com/4RyPWKTtV8
— (@khadaksingh_) September 20, 2025
advertisement
कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही - रोहित पवार
दरम्यान, भविष्यात कोणत्याही नागरिकाला अडचण आली नाही पाहिजे आणि कामं ही वेळेवर आणि नियमात झाली पाहिजेत, असा प्रयत्न आहे. त्यामध्ये मात्र दिरंगाई झाल्यास कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याबाबत सक्त सूचना प्रशासनाला दिल्या. काही अडचणी या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत त्याचाही पाठपुरावा सुरु राहील, असं रोहित पवार म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar : "खिशातला हात काढ आधी... गोट्या खेळत होता का?", रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं, पाहा Video