कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण पेट्रोल-डिझेल स्वस्त का नाही? रोहित पवारांनी मांडलं 11220 कोटींचं गणित!

Last Updated:

Rohit Pawar On petrol diesel prices : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयाची (एक्साईज ड्यूटी) वाढ केली आहे. त्यावर आता रोहित पवार यांनी टीका केली आहे.

Rohit Pawar On petrol diesel prices
Rohit Pawar On petrol diesel prices
Rohit Pawar Criticized BJP : पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर 13 रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलाची किंमत खूप कमी झाल्याचं पहायला मिळालं. एमसीएक्सवर 21 एप्रिल 2025 च्या डिलिव्हरीचे कच्चे तेल 3.48 टक्क्यांनी घसरून 5126 रुपये झाली असताना आता सरकारने मात्र सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही. अशातच आता विरोधकांनी याच मुद्द्यावरून रान उठवलं असताना रोहित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का वाढल्या? - रोहित पवार

मार्च महिन्यात कच्च्या तेलाची 84 डॉलर प्रति बॅरल असणारी किंमत एप्रिल महिन्यात 74 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरत असेल तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत की वाढल्या पाहिजेत? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

रोहित पवारांची सडकून टीका

advertisement
कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच या लुटारू सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयांची वाढ केली, घरगुती गॅस सिलिंडरमध्येही 50 रुपयांची वाढ केली. सामान्य जनतेला अच्छे दिन दाखवण्याची थोडी जरी भावना सरकारमध्ये असती तर कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किंमतीचा दिलासा सर्वसामान्यांनाही दिला असता, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा गप्प का? - रोहित पवार

advertisement
UPA सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलर असायचे तेव्हा पेट्रोलचे भाव 80 रुपये लिटर असताना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा आज कच्च्या तेलाच्या किंमती 74 डॉलर असताना पेट्रोलचे भाव 105 रुपयाच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

11220 कोटींचं गणित

advertisement
दरम्यान, देशात वर्षाकाठी एकूण 5000 कोटी लिटर्स पेट्रोल तर 11220 कोटी लिटर डिझेल विक्री होते. लिटरमागे 2 रुपये वाढवून 32000 कोटीची लूट केंद्र सरकार करणार आहे. महाराष्ट्रातून 3200 कोटींची लूट होणार आहे. HSRP नंबर प्लेटमधून आधी 1800 कोटी लुटले आणि आता हे 3200 कोटी..., असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण पेट्रोल-डिझेल स्वस्त का नाही? रोहित पवारांनी मांडलं 11220 कोटींचं गणित!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement