Sanjay Raut Sharad Pawar: शिंदे सत्कारावरून राऊतांची पवारांवर जळजळीत टीका, राष्ट्रवादीचाही पलटवार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
NCP Leader Reaction On Sanjay Raut : शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. या कौतुकानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. तर, आता राष्ट्रवादीनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली: दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. या कौतुकानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. तर, आता राष्ट्रवादीनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका करताना तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, आम्हालाही राजकारण कळतं अशी टीका केली. त्यावर डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले की,
हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची असल्याचा पलटवार कोल्हे यांनी राऊतांवर केला. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असेही खासदार कोल्हे यांनी म्हटले.
advertisement
पवारांनी स्टेट्समनशीप जपली...
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले की, मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनात काही मंडळी काम करत असताना त्यांच्या मागे शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणुन खंबीरपणे उभे आहेत. किंबहुना यात कुठलेही राजकारण न आणता स्टेट्समनशीपचा आदर्श पवार साहेबांनी घालून दिला असल्याचे कोल्हे यांनी म्हटले.
advertisement
राजकारणापलिकडे पाहता आलं पाहिजे...
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले की, मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना केवळ एकनाथ शिंदेच नाही तर आणखी 14 ते 15 जणांचा सत्कार या कार्यक्रमात होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक गोष्टी पाहायला पाहिजेत असं मला वाटतं असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
February 12, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut Sharad Pawar: शिंदे सत्कारावरून राऊतांची पवारांवर जळजळीत टीका, राष्ट्रवादीचाही पलटवार