Shashikant Shinde: साताऱ्यात जमिनी, सोनं-नाणं, मुंबईत घर, कोट्यवधींच्या गाड्या; शरद पवारांच्या नव्या प्रदेशाध्याक्षांच्या तिजोरीत संपत्ती किती?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याकडे एक कोटी 14 लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत.
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीची पुन्हा चर्चा सुरू झाली. 2024 साली त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे हे कोट्यधीश उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे एकूण 54 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे.
शशिकांत शिंदे यांच्याकडे तीन कोटी नऊ लाख रुपयांची जंगम, तर दोन कोटी 65 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दहा कोटींची शेतजमीन असून, एक कोटी 14 लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. 2019 मध्ये त्यांच्याकडे एकूण 44 कोटी 26 लाखांची संपत्ती होती. यामध्ये तब्बल दहा कोटी 12 लाखांनी वाढ होऊन ती 54 कोटी 38 लाखांवर गेली. शशिकांत शिंदे यांनी 2022- 23 मध्ये 57 लाख 67 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले होते. पत्नी वैशाली यांनी एक कोटी 46c हजार कर प्राप्त उत्पन्न, तर हिंदू अविभक्त कुटुंब तीन लाख सात हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे.
advertisement
पत्नीच्या नावे सात कोटी 48 लाखांची गुंतवणूक
तर विविध बॅंकांमध्ये शशिकांत शिंदेंची 22 लाख 17 हजारांची ठेवी व शिल्लक रक्कम आहे. तर पत्नी वैशालींच्या नावे 29 लाख 93 हजार 131 रुपयांच्या ठेवी व शिल्लक रक्कम आहे. विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये शशिकांत शिंदेंच्या नावे 84 लाख 98 हजारांची गुंतवणूक तर पत्नी वैशालींच्या नावे सात कोटी 48 लाखांची गुंतवणूक आहे.
advertisement
एक कोटी 14 लाखांच्या चार आलिशान गाड्या
शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याकडे एक कोटी 14 लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. यामध्ये फॉर्ड इंडिवेअर, टोयाटो फॉर्च्युनर, टोयाटो इनोव्हा, बीएमडब्ल्यू या गाड्यांचा समावेश आहे. शशिकांत शिंदे यांच्या पत्नीकडे 865 ग्रॅम सोने असून, त्याची किंमत 40 लाख 43 हजार रुपये आहे. शशिकांत शिंदेंकडे दहा कोटींची शेतजमीन असून, पत्नीच्या नावे 26 कोटी ८५ लाखांची जमीन आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shashikant Shinde: साताऱ्यात जमिनी, सोनं-नाणं, मुंबईत घर, कोट्यवधींच्या गाड्या; शरद पवारांच्या नव्या प्रदेशाध्याक्षांच्या तिजोरीत संपत्ती किती?