माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Tanaji Sawant: हृदयाचा त्रास सुरू झाल्याने माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे
वैभव सोनवणे, पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे. हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तानाजी सावंत यांना हृदयाचा त्रास झाल्याने शनिवारी सायंकाळी त्यांना तातडीने रूबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तीव्र वेदना होत असल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तातडीने औषधोपचार केल्याने सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र आजाराची तीव्रता लक्षात घेऊन रविवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement
कोण आहेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत हे शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते
तानाजी सावंत हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परांड्याचे
त्याच मतदारसंघातून ते लढतात, जिंकूनही येतात
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात ते जल आणि मृदा संवर्धन मंत्री होते
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते
तानाजी सावंत राजकारणाबरोबरच उद्योग व्यवसायात देखील आघाडीवर आहेत
advertisement
पुणे आणि शहर परिसरात त्यांचे शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे
कारखानदारी क्षेत्रातही त्यांचे बरेच उद्योग सुरू असतात
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 28, 2025 9:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू