Snake Lover: दोघांनी मिळून दिलं हजारो सापांना जीवनदान, पाहा सर्पमित्र भावांची धाडसी गोष्ट
- Published by:
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Snake Lover: साप दिसला की, आपली भीतीने गाळण उडते. मात्र, सोलापूरमधील दोन धाडसी भाऊ सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. त्यांनी हजारो सापांना जीवनदान दिलं आहे.
सोलापूर: सध्या राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे. सर्वदूर पाऊस सुरू आहे. पावसाळ्यामध्ये अनेक कीटक आणि सरिसृप प्राण्यांचे अस्तित्व ठळकपणे दिसते. विशेषत: पावसाळ्यामध्ये नागरी वस्तीमध्ये साप दिसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. साप हा प्राणी निसर्गातील अन्न साखळी अबाधित ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे सापाचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचं आहे. या कामासाठी सर्पमित्र उपयोगी येतात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे दोन भाऊ सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेश कांबळे आणि सागर कांबळे हे दोघे भाऊ साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहेत.
मोहोळ तालुक्यात राहणारे उमेश कांबळे व सागर कांबळे हे दोन्ही भाऊ 2010 पासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. ते दोघे जीवाचा धोका पत्करून नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. आतापर्यंत दोघांनी मिळून 2 ते 3 हजारांपेक्षा जास्त सापांचा जीव वाचवला आहे. सापांना वाचवण्यासाठी अनेकदा उमेश आणि सागर कांबळे पोटाला दोरी बांधून विहिरीत आणि शेततळ्यांमध्ये देखील उतरतात.
advertisement
नागरिकांमध्ये सापांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचं काम देखील हे भाऊ करत आहेत. साप म्हटलं की, आपण लगेच घाबरतो. मात्र, सर्वच साप माणसासाठी धोकादायक नसतात. जे बिनविषारी साप असतात ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पिकांना आणि धान्याला उंदीर किंवा इतर कीटकांपासून नुकसान होऊ नये, यासाठी बिनविषारी साप उपयुक्त ठरतात.
advertisement
नागरिकांनी सजग व्हावे
view commentsसोलापूर जिल्ह्यात घोणस, मण्यार, मांजऱ्या आणि नाग हे चार जातीचे विषारी साप जास्त प्रमाणात आढळतात. तसेच कवड्या नाग, धामण, विरुळा हे बिनविषारी साप आहेत. नागरिकांनी विषारी सापांची माहिती घ्यावी. विषारी आणि बिनविषारी साप दिसायला कसे असतात, याची व्यवस्थित माहिती घेतली तर त्यांचा प्रकार ओळखण्यास मदत होईल. नागरी वस्तीमध्ये साप दिसल्यास त्वरित जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र उमेश कांबळे यांनी केलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 30, 2025 6:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Snake Lover: दोघांनी मिळून दिलं हजारो सापांना जीवनदान, पाहा सर्पमित्र भावांची धाडसी गोष्ट

