तानाजी सावंतांच्या मुलाची अपहरणाची खरी स्टोरी, पोलिसांचा कसा घाम निघाला? खासगीत म्हणाले...

Last Updated:

Tanaji Sawant: बापाच्या या बालहट्टापाई पोराच्या ट्रीपचा बट्ट्याबोळ झाला हे जरी ठीक असले तरी पुणे पोलिसांचे तब्ब्ल पाच तास हा खोटा गुन्हा दाखल करून विमान थांबवण्यात गेले.

तानाजी सावंत
तानाजी सावंत
वैभव सोनवणे, पुणे : माजी मंत्री, शिवसेना नेते, तानाजी सावंतांच्या मुलांच्या अपहरणाची खरी स्टोरी अखेर समोर आलीय. एरवी बालहट्ट आपण सहज समजू शकतो पण बापाच्या हट्टापोटी आज संपूर्ण पुणे पोलिसांची अवस्था खराब झाली होती. मुलाला बॅकॉकला जाऊ न देण्याच्या हट्टापोटी तानाजी सावंतांनी पुणे पोलिसांचा अक्षरश: घाम काढलाय .
मुलगा चार्टर्ड विमानाने इच्छेविरोधात बॅकॉकला गेल्याने त्याच्या अपहरणाची तक्रार देऊन त्यांचं विमान पोलिसांकरवी चेन्नईला उतरवून त्याला पुन्हा माघारी बोलावून घेतलाय. पण बापाच्या या बालहट्टापाई पोराच्या ट्रीपचा बट्ट्याबोळ झाला हे जरी ठीक असले तरी पुणे पोलिसांचे तब्ब्ल पाच तास हा खोटा गुन्हा दाखल करून विमान थांबवण्यात गेले. त्यात तानाजी सावंतांनी आणलेल्या दबावामुळे पोलिसांचा ही नाईलाज झालेला होता. आता तपास चालू असल्याच्या नावाखाली हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
advertisement

पोलिसांवर दबाव आणून सावंतांनी उद्योग केले

पोलिसांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानाजी सावंतांनीच परस्परविरोधी भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. एकदा ड्रायव्हरने मुलगा विमानतळाहून खाजगी विमानाने बॅकॉकला गेल्याचे सांगितले, असे ते म्हणतात. पुन्हा विमान कुठले हे माहित नाही म्हणतात. त्यामुळे फक्त मुलगा आपल्या इच्छेविरोधात बॅकॉकला चाललाय आणि त्याला जाऊ द्यायचं नाही म्हणून पोलिसांवर दबाव आणून सावंतांनी हा उद्योग केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते.
advertisement

काय काय झाले?

सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले. पुणे पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटीमार्फत सूत्रे हलवून हवेतूनच विमान मागे फिरवले. चेन्नईला न उतरताच विमान हवेतूनच माघारी फिरले. रात्री आठ वाजून २० मिनिटांनी सावंतांच्या मुलाचे खासगी विमान पुणे विमानतळावर लँड झाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तानाजी सावंतांच्या मुलाची अपहरणाची खरी स्टोरी, पोलिसांचा कसा घाम निघाला? खासगीत म्हणाले...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement