Bhiwandi Crime : लिव्ह इन मधील प्रेयसीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय; प्रियकराकडून नात्याचा भयानक शेवट
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Bhiwandi Crime : प्रेयसीचा खुन करून परराज्यात पसार झालेल्या प्रियकराला कोनगाव पोलीसांनी 30 तासात अटक केली आहे.
भिवंडी, 21 सप्टेंबर (सुनिल घरत, प्रतिनिधी) : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी परराज्यात पळून गेला होता. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर कोनगाव पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून अवघ्या 30 तासात फरार आरोपीस बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे. अशी माहिती भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शब्बीर दिलावर शेख असे अटक प्रियकर आरोपीचे नाव आहे.
खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घटना उघडकीस
18 सप्टेंबर रोजी कोनगाव याठिकाणी गणेशनगर येथील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी एका महिलेची धारदार हत्याराने हत्या झाल्याचे उघड झाले होते. महिलेच्या मैत्रिणीने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवून पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मयत मधू प्रजापती हिच्या मैत्रिणीकडे केलेल्या चौकशीत मधू हीचा मित्र शब्बीर दिलावर शेख यांचे नाव समोर आले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करीत अंबरनाथ येथील कंपनी मधील त्याचे सहकारी यांच्याकडे माहिती घेतली असता तो पश्चिम बंगाल राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
त्यानंतर पोलीस पथक आरोपी शब्बीर याच्या शोधासाठी पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या मूळगावी दाखल झाले. स्थानिक पश्चिम बंगाल येथील पोलिसांच्या मदतीने तपास केला असता तो सासुरवाडी येथे निघून गेल्याचे समजताच सारापुला जिल्हा 24 परगणा येथे लपून बसलेल्या शब्बीर यास ताब्यात घेतले. आरोपी शब्बीर यास मयत मैत्रीण मधू हीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत सुध्दा प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचा प्राथमिक कारण असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 21, 2023 5:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Crime : लिव्ह इन मधील प्रेयसीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय; प्रियकराकडून नात्याचा भयानक शेवट