Thane News: धो धो पाऊस, तरीही ठाणेकरांवर जलसंकट, या भागात पुरवठा बंद, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Water Cut: ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पुढील 3 दिवस पाणीपुरवठा अनियमित आणि अपुरा राहणार आहे.
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह परिसरात पावसाचा जोर कायम आहे. धो धो पाऊस सुरू असतानाच ठाणेकरांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे आज, 27 जुलै रोजी दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून पुढील 2 दिवस अपुरा आणि अनियमित पुरवठा होईल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ठाणे माहपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांड्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण क्षमतेने पाणी पंपिंग होत नाही. तसेच गढूळपणामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.
advertisement
पाणी जपून वापरा
पिसे पंपिंग स्टेशनमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवार, 27 जुलै रोजी दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील 2 दिवस अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागेल. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 27, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane News: धो धो पाऊस, तरीही ठाणेकरांवर जलसंकट, या भागात पुरवठा बंद, कारण काय?