उल्हासनगरमध्ये कोसळला पूल, सेकंदासाठी बचावली तरुणी पण कशी? थरारक CCTV VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुलाजवळ गेलेली तरुणी अगदी काही सेकंदात बचावली, उल्हासनगरमधील पूल दुर्घटनेत थोडक्यात बचावली, नेमकं काय घडलं?
उल्हासनगर: वेळ हे सगळ्याचं उत्तर असतं आणि कधीतरी ती वेळच आपला जीव वाचवते हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका दुर्घटनेतून तरुण अगदी काही सेकंदासाठी वाचली आहे. उल्हासनगरमध्ये पूल कोसळल्याची घटना घडली. या पुलावरुन जाण्यासाठी तरुणी पुढे येत होती, मात्र तिला हाक मारल्याने ती मागे फिरली आणि थोडक्यात अनर्थ टळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलीय. पुल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
दरम्यान या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली. हा पूल कोसळल्याने 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झालाय. कॅम्प नंबर तीनच्या गणेश नगर भागात नाल्यावर असलेल्या या पूलाची दुरावस्था झाली होती.
advertisement
स्थानिकांनी अनेक आंदोलन,मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर रविवार सायंकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला.त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
advertisement
काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाची ठिकाणी बसून प्रतीकात्मक रडण्याचं आंदोलन केलं. दरम्यान हा पूल कोसळल्याने आमची गैरसोय झाली आहे, प्रशासनाने लवकरात लवकर नवा पुल बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
view commentsLocation :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
June 16, 2025 2:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उल्हासनगरमध्ये कोसळला पूल, सेकंदासाठी बचावली तरुणी पण कशी? थरारक CCTV VIDEO









