नवऱ्यासाठी वडाची पूजा करायला गेल्या महिला फेऱ्या मात्र अर्ध्याच; समोर उभं राहिलं संकट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सर्व 12 मधुमक्षिका डंखाच्या रूग्णांना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले असून सर्वांच्या तब्येतील सुधारणा होत आहे.
पोलादपूर : वटपौर्णिमेसाठी सर्व सुहासिनी वडाच्या झाडाची पुजा करायला जातात. तिथे झाडाला नैवेद्या दिलं जातं, शिवाय सात फेरेही वडाला घातले जातात आणि सात जन्म मला हाच नवरा मिळावा असं मागणं देखील देवाकडे करतात. आजचा दिवस सुहासिनींसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. पण पोलादपूर तालूक्यात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवे गावामध्ये सकाळी वटसावित्री पुजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या 11 सव्वाशिणींना मधमाशांचे मोहोळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून चावे घेतल्याची घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून चावे घेतले. या सर्व 12 मधुमक्षिका डंखाच्या रूग्णांना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले असून सर्वांच्या तब्येतील सुधारणा होत आहे.
advertisement
पोलादपूर तालुक्यात सर्वत्र सवाष्णींचा वटसावित्रीपूजनाचा सण आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे तब्बल 11 महिला आणि 1 पुरूष असे 12 जणांना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, या बातमीने ग्रामीण भागातील सर्वच जण प्रचंड हवालदिल झाले.
निवे गावातील वटवृक्षाखाली पाच- सहा महिलांची पूजा झाल्यानंतर आणखी चार पाच जणी वटवृक्षाखाली पुजेसाठी जमल्या. यामुळे सर्वांच्या पुजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण 100 फूट अंतरावर शेतात बांधांवरील गवताची बेणणी करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावून घेतले. यावेळी अनंत तळेकर यांनी नारळावरील सालं काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढले आणि चावे घेण्यास सुरूवात केली.
advertisement
यावेळी महिलांनादेखील मधमाशांनी डंख करण्यास सुरूवात केली. अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराचा दरवाजादेखील बंद करून घेतला. मात्र, तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये, चेहऱ्यावर तसेच हातावर आणि मानेवर दंश केल्याने सर्वांनाच वेदना असह्य होऊन त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या.
काही वेळाने मधमाशा शांत झाल्या आणि निघून गेल्या त्यानंतर अनंत तळेकर आणि सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्व 12 जणांना 108 आणि 102 रूग्णवाहिकेने दाखल केले. आता सर्वांच्या प्रकृती सुधार होत असल्याचे वैद्यकीय परिचारिकांनी सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2024 3:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवऱ्यासाठी वडाची पूजा करायला गेल्या महिला फेऱ्या मात्र अर्ध्याच; समोर उभं राहिलं संकट