Ration Card : उरले फक्त 22 दिवस! नंतर म्हणून नका सांगितलं नाही, होईल मोठं नुकसान

Last Updated:

E KYC करण्यासाठी 22 दिवस शिल्लक आहेत. 30 जून 2025 ही अंतिम मुदत आहे. E KYC न केल्यास रेशन कार्ड रद्द होईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने KYC करता येईल.

News18
News18
जर तुम्ही स्वस्त धान्याचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! तुमच्याकडे रेशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी आता फक्त २२ दिवस शिल्लक आहेत. सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की, 30 जूनपर्यंत ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांचे रेशन कार्ड बंद केले जाईल. त्यामुळे, अजूनही तुम्ही ई-केवायसी केली नसेल किंवा त्यात काही बदल करायचे असतील, तर आताच करून घ्या!
अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात स्पष्टता दिली आहे. सरकारने आतापर्यंत ५ वेळा ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे, पण आता 30 जून 2025 ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. जर तुम्ही या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते आणि तुम्हाला स्वस्त धान्य मिळणे थांबू शकते.
advertisement
ई-केवायसी प्रक्रिया म्हणजे रेशन कार्डधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे. हे पाऊल फसवणूक, अपात्र लाभार्थी, मृत व्यक्तींच्या नावाने लाभ घेणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त बनवण्यासाठी सरकार ही मोहीम राबवत आहे. यापूर्वी ई-केवायसीसाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख होती, परंतु अनेक लोकांना तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या माहितीमुळे नोंदणी करता आली नाही, म्हणून सरकारने ही मुदत वाढवून ३० जून केली आहे.
advertisement
तुम्ही ई-केवायसी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता:
ऑफलाइन ई-केवायसी: तुम्हाला ऑफलाइन केवायसी करायची असेल, तर तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन केंद्रावर जा. तिथे रेशन केंद्रावर तुम्ही बायोमेट्रिक थंब (अंगठ्याचा ठसा) देऊन केवायसी पूर्ण करू शकता.
ऑनलाइन ई-केवायसी: ऑनलाइन केवायसीसाठी तुम्हाला 'Mera Ration' आणि 'Aadhaar Face RD' ही ॲप्स वापरावी लागतील. या ॲप्समध्ये तुम्हाला लॉगिन करायचे आहे. त्यानंतर, तुम्ही राहात असलेले राज्य, शहर आणि आधार क्रमांक अपलोड करून 'फेस आयडेंटिफिकेशन' (चेहरा ओळखणे) करायचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.
advertisement
या प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागेल. जर कुटुंबातील एका जरी सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास टाळाटाळ केली, तर त्या कुटुंबाचे संपूर्ण रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्या सदस्याचे नाव वगळले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही आणि रेशन दुकानावर धान्यही मिळणार नाही. जर नाव वगळले गेले असेल, तर रेशन कार्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी 30 जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली आहे की नाही, याची खात्री करून घ्या आणि भविष्यातील अडचणी टाळा!
view comments
मराठी बातम्या/मनी/
Ration Card : उरले फक्त 22 दिवस! नंतर म्हणून नका सांगितलं नाही, होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement