डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा अपमान, Appleने 5 दिवसांत जागा दाखवली; नाकावर टिच्चून भारतात गुंतवले इतके कोटी!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Apple Investment In India: ॲपलसाठी फोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉनने भारतात मोठी गुंतवणूक करत 5 दिवसांत तब्बल 12,800 कोटी रुपये ओतले आहेत. हे पाऊल ॲपलच्या भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याच्या धोरणाचा भाग आहे.
न्यूयॉर्क: ॲपलसाठी आयफोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉनने गेल्या पाच दिवसांत त्यांच्या भारतीय युनिटमध्ये 1.48 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 12,800 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉनने सिंगापूरमधील त्यांच्या युनिटद्वारे तामिळनाडूतील युजान टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हे गुंतवणूक केली आहे.
ही गुंतवणूक 14 मे ते 19 मे दरम्यान करण्यात आली आहे. ॲपलच्या भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की ॲपल जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणारे बहुतेक आयफोन भारतातून खरेदी करेल. तर चीन इतर बाजारपेठांसाठी बहुतेक फोनचे उत्पादन करेल. कारण चीनमध्ये कर शुल्काबाबत अनिश्चितता आहे. फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन इंडिया (प्रामुख्याने टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकीची) या कंपन्या आयफोनच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या आहेत.
advertisement
ट्रम्प यांचा भारतात निर्मितीला विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच कतारमध्ये एका व्यापार परिषदेदरम्यान ॲपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली आणि त्यांना भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर आक्षेप घेतला. ट्रम्प म्हणाले, आम्ही चीनमधील तुमचे कारखाने अनेक वर्षे सहन केले आहेत. पण आता आम्हाला तुम्ही भारतात उत्पादन केलेले नको आहे. त्यांनी असेही म्हटले की भारत आधीच चांगली प्रगती करत आहे आणि ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे.
advertisement
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ॲपलने घोषणा केली होती की ते 2026 पर्यंत अमेरिकन बाजारपेठेसाठी बहुतेक आयफोन भारतातून निर्यात करेल. चीनमधून होणाऱ्या आयातीवरील अमेरिकेचे शुल्क टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र ट्रम्प यांनी या धोरणावर आक्षेप घेत म्हटले की भारत सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे.
advertisement
तज्ज्ञांचे मत आहे की ट्रम्प यांची ही मागणी ॲपलसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. जर ॲपलने अमेरिकेत आयफोनचे उत्पादन सुरू केले. तर एका आयफोनची किंमत सध्याच्या $1000 वरून सुमारे $3000 पर्यंत वाढू शकते. जी ग्राहकांसाठी खूप महाग ठरेल.
भारतातील गुंतवणूक सुरूच राहणार
दरम्यान भारतीय अधिकारी आणि ॲपलच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की भारतातील ॲपलच्या गुंतवणूक योजना सुरूच राहतील. भारतातील ॲपलचे उत्पादन भागीदार, जसे की फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स, यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणुकीची योजना आखली आहे.
advertisement
याव्यतिरिक्त भारताने अमेरिकन उत्पादनांवरील शुल्कात सूट देण्याचा प्रस्तावही दिला आहे. ज्यामुळे व्यापारिक संबंध सुधारण्याची शक्यता आहे. अहवालानुसार ॲपल पुढील वर्षापर्यंत अमेरिकेसाठी बनवल्या जाणाऱ्या सर्व iPhones ची असेंबली भारतात हलवू शकते. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी यापूर्वीच याची पुष्टी केली आहे की जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक iPhones भारतात बनलेले असतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 19, 2025 11:25 PM IST
मराठी बातम्या/मनी/
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा अपमान, Appleने 5 दिवसांत जागा दाखवली; नाकावर टिच्चून भारतात गुंतवले इतके कोटी!


