Gold News: सोन्याच्या दरांचा नवा इतिहास, किमतीने मोडले सर्व रेकॉर्ड; पुढचे टार्गेट किती? दिवाळीत सोनं खरेदी करणे परवडणार का?

Last Updated:

Gold Price Today: डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दराने आज एमसीएक्सवर नवा उच्चांक गाठला असून, यामुळे गुंतवणूकदारांची मागणी वाढली आहे. सोन्याचा दर झपाट्याने वाढत 10 ग्रॅमला 1.02 लाखांवर पोहोचला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: आज सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे सोन्याचा भाव एमसीएक्सवर आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव आज वाढीसह 1,02,700 रुपयांच्या पातळीच्या पुढे गेला आहे. जो किमतीचा नवा उच्चांक आहे.
advertisement
एमसीएक्सवरील सोन्याचा ऑक्टोबरचा वायदा करार अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढून नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे आज चांदीमध्येही वाढ दिसून आली. सप्टेंबरचा करार अर्धा टक्क्यांच्या वाढीसह 1,17,800 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे असलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या भावात सतत वाढ होत आहे आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सोन्याचे भाव 3 टक्के वाढले आहेत.
advertisement
भाव कुठे पोहोचले?
एमसीएक्सवर आज सोन्याचा वायदा भाव ऑक्टोबर 2025 च्या करारासाठी अर्ध्या टक्क्याहून अधिक वाढीसह 1,02,774 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. जी आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. आजच्या सत्रात भाव 102069 ते 102774 च्या पातळीमध्ये होते. किमतींमध्ये सुरुवातीपासूनच तेजी कायम असून सध्या भाव वरच्या पातळीजवळ आणि 1,02,700 च्या पातळीच्या वर आहेत.
advertisement
सोन्याच्या किमतीत वाढ का होत आहे?
सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता. यासोबतच जगभरात सुरू असलेल्या अनिश्चितता आणि तणावामुळे सोन्याची गुंतवणूक मागणी वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आपली जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढलेल्या या गुंतवणुकीच्या मागणीचा परिणाम किमतींवर होत आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Gold News: सोन्याच्या दरांचा नवा इतिहास, किमतीने मोडले सर्व रेकॉर्ड; पुढचे टार्गेट किती? दिवाळीत सोनं खरेदी करणे परवडणार का?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement