HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, या वेळेत 2 दिवस बंद राहणार UPI सेवा

Last Updated:

एचडीएफसी बँकेच्या 12-13 सप्टेंबर रात्री सिस्टिम अपडेटमुळे UPI सेवा बंद राहणार, Google Pay, PhonePe, Paytm व्यवहार थांबतील, PayZapp वापरण्याचा सल्ला दिला आहे.

News18
News18
मुंबई: तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रात्री अचानक एखादं तातडीचं पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनवर ट्रान्झॅक्शन फेल असा मेसेज दिसला, तर? एचडीएफसी बँकेच्या लाखो ग्राहकांना अशीच परिस्थिती उद्भवणार आहे, कारण बँकेने 12-13 सप्टेंबरच्या रात्री UPI पेमेंट चालणार नाही. सिस्टिम अपडेट करण्यासाठी दोन दिवस रात्री काम सुरू असल्याने UPI सेवा बंद राहणार आहे.
कोणत्या वेळेत सेवा बंद राहतील?
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हे देखभाल कार्य 12-13 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 1.30 वाजेपर्यंत चालेल. म्हणजे दीड तासासाठी UPI सेवा बंद राहणार आहेत. साधारणपणे या वेळेत लोक झोपलेले असतात, पण रात्रीच्या प्रवासात, हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थिती आल्यास किंवा व्यापारी वर्गाला पेमेंट घ्यावं लागल्यास त्रास होऊ शकतो.
कोणत्या सेवांवर परिणाम होणार?
ही अडचण केवळ साध्या ग्राहकांपुरतीच मर्यादित नाही. एचडीएफसी बँक चालू व बचत खात्यांशी जोडलेले सर्व UPI व्यवहार थांबतील. RuPay क्रेडिट कार्डवर आधारित UPI पेमेंट होणार नाही. एचडीएफसी मोबाइल बँकिंग ॲप तसेच Google Pay, PhonePe, Paytm सारख्या तृतीय पक्ष ॲप्समधून होणारे व्यवहार अडकतील. व्यापाऱ्यांसाठी जोडलेली सर्व UPI सेवा देखील या वेळेत ठप्प राहतील.
advertisement
बँकेनं ग्राहकांना दिली सूचना
एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे सूचना दिली आहे. या काळात गरजेचे व्यवहार आधीच पूर्ण करावेत किंवा बँकेचं डिजिटल वॉलेट PayZapp वापरावं, असा सल्ला देण्यात आला आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, डिजिटल पेमेंट्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लाखो लोक रोज UPI वापरत असल्याने सिस्टमवर प्रचंड दबाव येतो. या सेवेत वेग आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी नियमित अपग्रेड करणं बँकांसाठी आवश्यक असतं. दीड तासांचा हा ब्रेक भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असंही तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
नेटबँकिंग सुरू करण्याची सोपी पद्धत
बँकेने अजूनही नेटबँकिंग न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सोपी प्रक्रिया जाहीर केली आहे. ग्राहक आयडी किंवा खाते क्रमांक टाकून, नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या OTP द्वारे ओळख सत्यापित करायची आणि नवा पासवर्ड सेट करून लॉगिन करायचं. म्हणजे आता शाखेत रांगेत थांबण्याची गरजच नाही.
UPI आणि ऑनलाईन बँकिंगमुळे पेमेंट होणार नाही. त्यामुळे थोडे पैसे हातात ठेवा नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुमची पेमेंटची काम आजच उरकून घ्या. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार रात्री 12.30 वाजल्यापासून सकाळी 7.30 पर्यंत सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था आधीच करुन ठेवा.
मराठी बातम्या/मनी/
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, या वेळेत 2 दिवस बंद राहणार UPI सेवा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement