Post Office मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन आहे? पाहा कोणत्या स्किमवर किती मिळतंय व्याज

Last Updated:

साधारणपणे, सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस स्किमवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. 1 जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाईल. तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होतो.

पोस्ट ऑफिस
पोस्ट ऑफिस
Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या स्किम चालवल्या जातात. अशा अनेक स्किम आहेत ज्यावर बँकांकडूनही चांगले व्याज मिळते. बँकांप्रमाणे, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी, आरडी आणि पीपीएफ सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय अशा काही योजना आहेत ज्यांचा पर्याय तुम्हाला बँकेतही मिळणार नाही. साधारणपणे, सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. 1 जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाईल. तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होतो.
पोस्ट ऑफिस स्किमचे व्याजदर
- पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट- 4%
- 1 वर्ष टाइम डिपॉझिट- 6.9%
- 2 वर्ष टाइम डिपॉझिट- 7.0%
- 3 वर्ष टाइम डिपॉझिट- 7.1%
- 5 वर्ष टाइम डिपॉझिट- 7.5%
- 5 वर्ष रिकरिंग डिपॉझिट अकाउंट- 6.7%
- सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम- 8.2%
- मंथली इन्कम स्किम- 7​.4%
advertisement
- पब्लिक प्रोव्हिडंट फंड स्किम- 7.1%
- सुकन्या समृद्धी अकाउंट- 8.2​​​%
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट- 7.7%
- किसान विकास पत्र- 7.5%
- महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट - 7.5%
पीएम मोदी आणि स्मृती इराणी यांनी या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे
NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओमध्येही या योजनेचा समावेश आहे. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे.
advertisement
या स्किमचा ऑप्शन फक्त पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध
POMIS स्किम ही दरमहा नियमित उत्पन्न देणारी स्किम आहे. या योजनेत, एका अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटवर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही रक्कम 5 वर्षांसाठी ठेवली जाते. यावर 7.4% दराने पैसे दिले जातात. गुंतवणूकदार व्याजाद्वारे कमावतात.
मराठी बातम्या/मनी/
Post Office मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन आहे? पाहा कोणत्या स्किमवर किती मिळतंय व्याज
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement