Youtube वरून सुचली कल्पना, प्रज्ञा यांनी सुरू अनोखा व्यवसाय, आता महिन्याला 70 हजार कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
आवड आणि अंगात असलेल्या कलागुणाचा वापर करून नाशिकमधील प्रज्ञा यांनी हॅन्ड आणि फूट कास्टिंगचा अनोखा व्यवसाय सुरु केला आहे. ज्यात त्या अनेकांच्या आठवणी स्पर्श हे एका कलाकृतीच्या माध्यमातून लोकांना बनवून देत असतात.
नाशिक: आवड आणि अंगात असलेल्या कलागुणाचा वापर करून नाशिकमधील प्रज्ञा यांनी हॅन्ड आणि फूट कास्टिंगचा अनोखा व्यवसाय सुरु केला आहे. ज्यात त्या अनेकांच्या आठवणी स्पर्श हे एका कलाकृतीच्या माध्यमातून लोकांना बनवून देत असतात. या व्यवसायाच्या माध्यमातून या महिलेने आपली एक वेगळीच ओळख ही निर्माण केली आहे.
प्रज्ञा या एक डेंटिस्ट आहेत. पुण्याला त्यांचे क्लिनिक चालवत असताना त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फूट आणि हॅन्ड कास्टिंग बनवण्याची आवड निर्माण झाली. सुरुवातीला यूट्यूबवरून बघून बघून त्यांनी हे सर्व गोष्टी बनवण्यास सुरुवात केली. यात आवड तर होती परंतु पुरेसे असे ज्ञान नसल्याने त्यांचे प्रयत्न हे अपयशी ठरत होते.
advertisement
परंतु यात आपल्याला आवड ही निर्माण झाली आहे याकरता आपण याचे क्लासेस करून असा विचार करून त्यांनी एक सर्टिफाइड क्लास देखील केला. क्लास करत असताना बनविलेले त्यांचे हे साचे आणि त्यापासून तयार झालेली कलाकृती यांचे प्रदर्शन प्रज्ञा यांनी भरवण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावरून आलेली कल्पना सोशल मीडियावरून पसरविण्यास त्यांनी सुरुवात केली. मूळच्या नाशिक येथे राहणाऱ्या असल्याने त्यांनी नाशिकमध्ये या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी नसल्याने नाशिकमध्ये याचा आपण व्यवसाय सुरू करू असा विचार केला. सुरुवातीला प्रज्ञा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बनविलेल्या गोष्टी नाशिककरांपर्यंत पोहोचविल्या. नाशिककरांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे त्या सांगत असतात.
advertisement
आजवर प्रज्ञा यांनी जवळपास 1 हजारावरून जास्त असे लोकांचे हॅप्पी मोमेंट स्टॅच्यू तसेच नवीन जन्माला आलेल्या बाळांचे हाताच्या कलाकृती बनवून दिलेल्या आहेत. तसेच 500 हून ही अधिक असे पाळीव प्राण्यांचे देखील पायांच्या आठवणींचे ठसे त्यांच्या जिवलगण बनवून दिल्या आहेत. अशा काहीतरी नवीन व्यवसायाची सुरुवात करून त्यांनी इतर महिलांसाठी प्रेरणादायी कार्य केले आहे. आवड असली तर आपण कसल्याही गोष्टीत यश प्राप्त करू शकतो याचे उत्तम असे उदाहरण देखील त्यांनी समाजासमोर दिले आहे.
advertisement
काय आहे हॅन्ड आणि फूट कास्टिंग हा प्रकार?
हॅन्ड आणि फूट कास्टिंग हा असा प्रकार आहे जो आपण आपल्या हातांचा किंवा आपल्या जवळील व्यक्तींच्या आठवणी जपण्यासाठी बनवलेली एक थ्रीडी अशी कलाकृती आहे. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात पसरत आहे. ही बनवलेली वस्तू आपल्याला जिवलगणांच्या स्पर्शाचा अनुभव देत असते. तसेच प्रज्ञा हे सर्व कास्टिंग फक्त एका दिवसात आपल्याला बनवून देत असतात. ज्याची सुरुवात त्यांच्याकडे 3 हजारापासून ते पुढे घेतली तशी आहे. या व्यवसायातून त्या महिन्याला 60 ते 70 हजार कमाई करतात.
advertisement
कुठे बनवून भेटणार हे कास्टिंग मॉडेल?
view commentsप्रज्ञा या सर्व गोष्टी होम टू होम देखील येऊन बनवून देत असतात. तसेच यांचे इंस्टाग्राम पेज लाइफ कास्टिंग स्टुडिओ बाय प्रज्ञा या नावाने आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 07, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Youtube वरून सुचली कल्पना, प्रज्ञा यांनी सुरू अनोखा व्यवसाय, आता महिन्याला 70 हजार कमाई