SEBIने दिला मोठा झटका; 18 गुंतवणूक सल्लागारांचे रजिस्ट्रेशन रद्द, Share Market सुरू होण्याआधी वाचा महत्त्वाची अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: सेबीने मोठी कारवाई करत 18 गुंतवणूक सल्लागारांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. नूतनीकरण फी न भरल्यामुळे घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
मुंबई: मार्केट रेग्युलेटर असलेल्या सेबीने (Securities and Exchange Board of India) बुधवारी 18 गुंतवणूक सल्लागारांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. सेबीच्या नियमांनुसार आवश्यक असलेल्या नूतनीकरण फी (Renewal Fee) जमा न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
रद्द केलेल्या सल्लागारांमध्ये पलाडिन कॅपिटल मॅनेजमेंट एलएलपी, विशाल बन्सल, निमित अग्रवाल, एल्गोएनालिटिक्स फायनान्शियल कन्सल्टन्सी, शाह इन्व्हेस्टर होम, एजीएक्विझिशन्स मार्केट्स, निधी कन्सल्टंट्स, धर्मेश परमार, अभिनय जैन आणि समीर कुमार झा यांचा समावेश आहे. सेबीच्या महाव्यवस्थापक सोमा मजुमदार यांनी आदेशात म्हटले आहे की, मध्यस्थ नियम, 2008 नुसार, नोटीस क्रमांक 1 ते 18च्या गुंतवणूक सल्लागारांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द केले जात आहे."
advertisement
नूतनीकरण फी नियम
सेबीच्या गुंतवणूक सल्लागार नियमांनुसार प्रत्येक नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराला आपले लायसन्स सक्रिय ठेवण्यासाठी दर पाच वर्षांनी नूतनीकरण फी जमा करणे बंधनकारक आहे. ही फी सध्याच्या रजिस्ट्रेशनची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने आधी भरणे आवश्यक असते. सेबीला आढळले की- या सल्लागारांनी अनेक वेळा सूचना देऊनही फी जमा केली नाही. सेबीने या संस्थांना या वर्षी फेब्रुवारी ते जून दरम्यान अनेक 'शो-कॉज' नोटीस बजावल्या होत्या.
advertisement
रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारणे
सेबीने म्हटले आहे की- या सल्लागारांचे सर्टिफिकेशन आधीच संपलेले आहेत. त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करणे आवश्यक होते. जेणेकरून त्याचा गैरवापर करून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होण्यापासून रोखता येईल.
जुनी जबाबदारी कायम
advertisement
रजिस्ट्रेशन रद्द झाल्यानंतरही या सल्लागारांची जुनी जबाबदारी संपणार नाही. रजिस्ट्रेशन रद्द झाल्यानंतरही संबंधित गुंतवणूक सल्लागार म्हणून केलेल्या किंवा न केलेल्या कोणत्याही कामासाठी ते जबाबदार राहतील, असे आदेशात म्हटले आहे.
सेबीने या गुंतवणूक सल्लागारांना त्यांची रेकॉर्ड्स सांभाळणे, प्रलंबित गुंतवणूकदार तक्रारींचे निराकरण करणे, ग्राहकांना सेवांची निरंतरता सुनिश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार निधी किंवा सिक्युरिटीजचे हस्तांतरण करण्याच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/मनी/
SEBIने दिला मोठा झटका; 18 गुंतवणूक सल्लागारांचे रजिस्ट्रेशन रद्द, Share Market सुरू होण्याआधी वाचा महत्त्वाची अपडेट