Business Success Story : एकसुरी पणाला कंटाळून नोकरी सोडली, तयार केला पारंपरिक पदार्थांचा ब्रँड, वर्षाला 80 लाखांची उलाढाल

Last Updated:

डोंबिवलीत राहणाऱ्या शीतल सावंत यांनी नोकरी सोडून व्यवसायाच्या मार्गावर पाऊल टाकलं आणि कोकणातील पारंपरिक पदार्थांचा व्यवसाय उभारून आज अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. या व्यवसायच्या माध्यमातून त्यांना वर्षाला 80 लाख लाखांची कमाई होत आहे. 

+
News18

News18

मुंबई : आजकाल बरेच जण नोकरी सोडून व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. डोंबिवलीत राहणाऱ्या शीतल सावंत यांनी नोकरी सोडून व्यवसायाच्या मार्गावर पाऊल टाकलं आणि कोकणातील पारंपरिक पदार्थांचा व्यवसाय उभारून आज अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. या व्यवसायच्या माध्यमातून त्या वर्षाला 80 लाखांची उलाढाल करत आहेत.
शीतल सावंत यांचं शिक्षण पदवीपर्यंत झालं असून त्यांनी जवळपास 8 ते 10 वर्ष नोकरी केली. मात्र, त्या नोकरीच्या एकसुरी पणाला कंटाळून त्यांनी स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोकणातील आपल्या मूळ गावात मिळणाऱ्या पारंपरिक हंगामी पदार्थांवर आधारित एक व्यवसाय उभारायचा, असं त्यांनी ठरवलं आणि 2016 साली सिंधुरत्न या नावाने व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
घरगुती पद्धतीने उत्पादने तयार करून सुरुवात
या व्यवसायातून त्यांनी कोकणातील खास खाद्यपदार्थ कुळीथाचं पीठ, घावण्याचं पीठ, कोकम आगळ , कोकम सरबत यांसारख्या उत्पादनांची विक्री सुरू केली. सुरुवातीला त्यांनी ही उत्पादने आपल्या मित्र-मैत्रिणींना विकली. हळूहळू त्यांची उत्पादने लोकप्रिय होऊ लागली आणि त्यांच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. हे सर्व पदार्थ त्या घरात बनवायच्या.
advertisement
80 लाखांचा टर्नओव्हर आणि भरघोस नफा
आज शीतल सावंत यांचं सिंधुरत्न हे ब्रँड मुंबईत नावारूपाला आलं आहे. त्यांनी डोंबिवली ठाण्यामध्ये तीन आणि नुकतंच दहिसरमध्ये एक असे एकूण चार आउटलेट्स उघडले आहेत. विशेष बाब म्हणजे, त्या फक्त रिटेलमध्येच नव्हे तर होलसेल स्वरूपातही उत्पादने विकतात. आणि यातील 17 ते 18 पदार्थ त्या घरात बनवतात.
advertisement
शीतल सावंत केवळ स्वतःच उद्योजिका न राहता, इतर महिलांना देखील घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्यामार्फत काम करणाऱ्या महिलांना दरमहा 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येते, असं त्या सांगतात. आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर तब्बल 80 लाखांपर्यंत जातो. त्यांच्या होलसेल विक्रेत्यांना 70 टक्क्यांपर्यंत नफा मार्जिन मिळतो.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महिला आता शीतल सावंत यांच्याशी जोडून काम करत असून स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. जर तुम्हाला देखील यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सिंधुरत्न ट्रेडिंग या त्यांच्या वेबसाइटद्वारे तुम्ही शीतल सावंत यांच्याशी संपर्क साधू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Business Success Story : एकसुरी पणाला कंटाळून नोकरी सोडली, तयार केला पारंपरिक पदार्थांचा ब्रँड, वर्षाला 80 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement