Jeff Bezos Story : जन्मदात्या बापाने लाथाडलं, आईचं दुसरं लग्न, सावत्र वडिलांनी वाढवलं, आज देतोय इलॉन मस्कला टक्कर
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
Jeff Bezos Story : दोन दिवसांपूर्वी जेफ बेझोस जगातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मात्र आता ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. विशेष म्हणजे जेफ बेसोझ हे सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत पोहचल्याचे आहेत.
मुंबई : मागच्या दोन-तीन दिवसांपासून श्रीमंतांच्या यादीत वेगाने बदल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेसोस यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकून ब्लूमबर्ग रिच लिस्टमध्ये पहिलं स्थान पटकावलं. दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि आज पहिल्या नंबरवर बर्नार्ड अरनॉल्ट (206 बिलियन डॉलर्स) आहेत. इलॉन मस्क (204 बिलियन डॉलर्ससह) दुसऱ्या, तर जेफ बेझोस (202 बिलियन डॉलर्स) तिसऱ्या नंबरवर आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग 166 बिलियन डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या तीन स्थानांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. कारण तिघांच्या संपत्तीतला फरक खूपच कमी आहे.
जेफ बेझोस यांची गोष्ट जाणून घेऊ या. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी छापल्या गेल्या आहेत; पण त्यांच्या आयुष्यातल्या काही पैलूंबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. सध्या अब्जाधीश असलेले जेफ बेझोस पूर्वीपासून अब्जाधीश नव्हते. ॲमेझॉनची स्थापना केल्यावर त्यांचं नशीब पालटलं.
वडिलांमुळे बदललं जेफ यांचं आडनाव
जेफ बेझोस यांचा जन्म 12 जानेवारी 1964 रोजी झाला. आई जॅकलिन गिज जॉर्गेनन्सने किशोरवयीन असताना जेफला जन्म दिला. जेफच्या बायोलॉजिकल वडिलांचं नाव टेड जॉर्गेनन्स होतं. ते बाइक शॉपचे मालक होते. जेफ खूप लहान असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. मग त्यांच्या आईने मिगुअल बेझोसशी दुसरं लग्न केलं. मिगुअलनी जेफला स्वीकारलं आणि स्वतःचं आडनाव दिलं. त्यामुळे जेफ जॉर्गेनन्स जेफ बेझोस झाले.
advertisement
मध्यमवर्गीय कुटुंब
बेझोस कुटुंबीय मध्यमवर्गीय होतं. त्यांचे वडील एक्सनमध्ये इंजिनिृीअर होते. त्यांच्या वडिलांची खूप ठिकाणी बदली झाली आणि जेफ त्यांच्याबरोबर गेले. नोकरीनिमित्त ते ह्यूस्टन, टेक्सास या ठिकाणी शिफ्ट झाले होते.
जेफ बेझोस यांनी ॲमेझॉनची सुरुवात कशी केली?
सामान्य कुटुंबातल्या जेफ बेझोस यांनी 1986 मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये स्पेशलायझेशन केलं होतं. शिक्षण संपल्यावर वॉल स्ट्रीटवरील फिटेल, बँकर्स ट्रस्ट आणि डी. ई. शॉ अँड कंपनी अशा अनेक फर्ममध्ये काम केलं. डी. ई. शॉ अँड कंपनीत ते व्हॉइस प्रेसिडंट झाले. चांगला पैसा मिळत होता, पण त्यांनी मनाचं ऐकलं व नोकरी सोडली. मग त्यांनी असं काम सुरू केलं ज्याला लोक जुगार म्हणायचे. त्यांनी 1994 साली ॲमेझॉनची स्थापना केली. आपल्या लहानशा टीमसोबत त्यांनी गॅरेजमध्ये स्टार्टअप सुरू केलं.
advertisement
मेहनत करून मिळवलं यश
सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक आव्हानं आली; पण जेफ त्यांच्या टीमसोबत तासन् तास काम करत राहिले. यशाची चिन्हं दिसत नव्हती. सुरुवातीला कंपनीला तोटा सहन करावा लागला. आर्थिक संकटामुळे कंपनी फ्लॉप होण्याची मोठी शक्यता होती. पण जेफ यांनी कधीच हार मानली नाही आणि काम करत राहिले. आता जेफ बेझोस यांनी एवढा पैसा कमावला आहे की त्यांच्या अनेक पिढ्या कोणतंही काम न करता आरामात जगू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2024 8:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Jeff Bezos Story : जन्मदात्या बापाने लाथाडलं, आईचं दुसरं लग्न, सावत्र वडिलांनी वाढवलं, आज देतोय इलॉन मस्कला टक्कर