Dahi Handi : हंडी कोण फोडणार? भिवंडीत दोन गोविंदा पथकांचा वाद संपेना, शेवटी आयोजकांनी पोलिसांना...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवसेना भिवंडी शहर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने स्व.आनंद दिघे चौकात आयोजित धर्मवीर मानाची दहीहंडी आयोजित केली होती. याठिकाणी दोन पथकात वाद झाल्याने शेवटी पोलिसांनीच दहीहंडी फोडली.
सुनिल घरात, भिवंडी, 08 सप्टेंबर : राज्यात काल मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. भिवंडी शहरात गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यासाठी शहरात लाखो रुपयांच्या बक्षीसांची खैरात असलेल्या दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या. शिवसेना भिवंडी शहर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने स्व.आनंद दिघे चौकात आयोजित धर्मवीर मानाची दहीहंडी आयोजित केली होती. याठिकाणी दोन पथकात वाद झाल्याने शेवटी पोलिसांनीच दहीहंडी फोडली.
भिवंडीत डायमंड जिमको चाविंद्रा व ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव या दोन गोविंद पथकांनी आठ थरांची सलामी दिली होती. त्यामुळे हे दोन संघ पात्र ठरले होते. परंतु दहीहंडी फोडण्याचा मान चिठ्ठी काढून देण्याच्या निर्णयाला या दोन्ही संघांनी विरोध दर्शवला. त्यावरून दोन्ही संघात वाद झाला. उशीर ही झालेला असल्याने आयोजक असलेले शिवसेना भिवंडी जिल्हा प्रमुख सुभाष माने यांनी या दोन्ही संघांना पारितोषिकाची 1,11,111 रुपयांची रक्कम दोन्ही संघात वितरीत करून सन्मान चिन्ह दिले.
advertisement
बक्षीसाची रक्कम विभागून दिली पण हंडीचे काय करायचे असा प्रश्न होता. शेवटी आयोजकांनी हंडी फोडण्याचा मान दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिला. विशेष म्हणजे पोलिसांनीसुद्धा मोठ्या जल्लोषात ही हंडी फोडण्यासाठी मनोरा उभा केला. हंडी फोडण्याचा मान भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील असलम शेख या मुस्लिम पोलीस बांधवांस दिला. त्यामुळे भिवंडी शहरात ही दहीहंडी चर्चेचा विषय ठरली आहे. आयोजकांकडून तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हितचिंतकांकडून पोलीस पथकाला रोख चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक सुद्धा देण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभर बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांनीसुध्दा डिजे च्या तालावर ठेका धरला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2023 4:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Dahi Handi : हंडी कोण फोडणार? भिवंडीत दोन गोविंदा पथकांचा वाद संपेना, शेवटी आयोजकांनी पोलिसांना...