baba siddique : 15 दिवसांपूर्वीच रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट? त्या फोनकडं दुर्लक्ष केलं अन्.., गोळीबाराची Inside story
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आमदार बाब सिद्दिकी यांच्यावर शनिवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला, आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई, प्रणाली कापसे, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाब सिद्दिकी यांच्यावर शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सिद्दिकी हे आपला मुलगा आणि आमदार जिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यलयात आले होते. याचवेळी ही घटना घडली. या घटनेत बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना दोन आरोपींना पोलिसांनी पकडलं, मात्र दोन आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. करनैल सिंह राहणार हरियाणा व धर्मराज कश्यप राहणार उत्तर प्रदेश अशी या आरोपींची नावं आहेत
दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षानं घटनास्थळी आले होते. त्यानंतर ते सिद्दिकी यांची वाट पाहात त्याच ठिकाणी थांबले. जेव्हा सिद्दिकी हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी आले, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील दोन गोळ्या सिद्दिकी यांच्या छातीला लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तीन आरोपींव्यतिरिक्त अन्य एका आरोपीचा देखील या गोळीबारात सहभाग आहे. या तीन आरोपींना बाबा सिद्दिकी यांच्याबाबत माहिती पुरवण्याचं काम या आरोपीनं केलं आहे. सिद्दिकी यांच्या लोकेशनची माहिती देखील याच आरोपींनी इतर तीन जणांना सांगितल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान मागीत अनेक दिवसांपासून बाबा सिद्दिकी यांच्या मागावर हे आरोपी होते, संधी मिळताच त्यांनी गोळीबार केला अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वीच बाब सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र धमकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिद्दिकी यांचा घात झाला. आरोपी गेल्या 15 दिवसांपासून सिद्दिकी यांच्यावर पाळत ठेवून होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2024 8:06 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
baba siddique : 15 दिवसांपूर्वीच रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट? त्या फोनकडं दुर्लक्ष केलं अन्.., गोळीबाराची Inside story