हृदयद्रावक! वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला निघाले, वाटेत घडला भयानक अपघात, 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू
Last Updated:
Nalasopara Accident : नालासोपाऱ्यात वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असताना ट्रकच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा : नालासोपारा येथे एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर भयानक घटना घडली. जिथे सात वर्षाच्या चिमुकल्याचा अपघातात दुर्देवी अंत झालेला आहे.
अपघात घडला तरी कसा?
आचोळे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समीर थोरी (वय32) यांनी आपल्या पत्नी काजल आणि सात वर्षांच्या मुलगा हर्षला घेऊन शनिवारी संध्याकाळी वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्व काही सुरळीत चालत असताना उसगाव येथील शिरसाड वज्रेश्वरी रोडवर अचानक भयावह घटना घडली.
एका ट्रक चालक अत्यंत वेगाने असल्याने याच वेळी तेथून जात असलेल्या या कुटुंबाच्या दुचाकीला धक्का दिला, ज्यामुळे दुचाकीवरून पडलेल्या हर्षच्या डोक्यावर ट्रकचा चाक चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेने वज्रेश्वरी रोडवरील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले कुटुंबीयांसह शेजाऱ्यांचे अश्रू थांबत नव्हते.
advertisement
मांडवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी सुरक्षा उपाययोजनांच्या कमतरतेवर चिंता व्यक्त केली असून रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
हृदयद्रावक! वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला निघाले, वाटेत घडला भयानक अपघात, 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू










