आताची सर्वात मोठी बातमी! एअर इंडियानं नाव बदललं पण... दुर्घटनेनंतर अहमदाबादहून लंडनला जाणारं पहिलं विमान रद्द

Last Updated:

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं AI 159 विमान तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आलं आहे.

एअर इंडिया प्लेन
एअर इंडिया प्लेन
आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान अचानक रद्द करण्यात आलं आहे. एअर इंडियाचं AI 159 विमान रद्द करण्यात आलं आहे. या विमानात तांत्रिक अडचणी येत असल्याने विमान रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणार A171 विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर एअर इंडियाचं पहिलंच विमान लंडनसाठी रवाना होणार होतं, मात्र त्याआधीच तांत्रिक बिघाड आल्याने विमान रद्द करण्यात आलं आहे.
AI 171 विमान 12 जून रोजी अहमदाबादच्या गांधीनगर विमानतळाजवळ टेकऑफ करताना दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं आहे. नेमकं चाललंय काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये विमानात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
advertisement
AI 171 विमानाचं एअर इंडियाने नाव बदलून 159 केलं होतं. आज हे विमान अहमदाबादहून लंडनसाठी टेकऑफ करणार होतं. मात्र त्याआधीच तांत्रिक बिघाड आल्याने विमान रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी सकाळी अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानात देखील तांत्रिक बिघाड झाला होता. हे विमान 30-45 मिनिटं अहमदाबाद इथे थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हे विमान मुंबईला रवाना झालं होतं.
मराठी बातम्या/देश/
आताची सर्वात मोठी बातमी! एअर इंडियानं नाव बदललं पण... दुर्घटनेनंतर अहमदाबादहून लंडनला जाणारं पहिलं विमान रद्द
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement