China On Operation Sindoor : 'आम्ही दहशतवादाविरोधात पण...', चीनची भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

China On Operation Sindoor : भारताच्या या एअर स्ट्राइकवर भारताचा शेजारी देश चीनने प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादाला आमचा विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे. मात्र, एअर स्ट्राइकवर आश्चर्यजनक प्रतिक्रिया दिली आहे.

file photo
file photo
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारताच्या या एअर स्ट्राइकवर भारताचा शेजारी देश चीनने प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादाला आमचा विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे. मात्र, एअर स्ट्राइकवर आश्चर्यजनक प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या मोहिमेत मंगळवारी रात्री उशिरा पीओकेमधील मुजफ्फराबाद, मदिरके आणि कोटली येथे एअर स्ट्राईक केली. भारताच्या या हवाई हल्ल्यात 90 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेकजण जखमी आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्या कुटुंबीयातील सदस्य भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ठार झाले आहेत. यात त्याची बहीण, भाचा यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

चीनने काय म्हटले?

भारताने आज पहाटे केलेल्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईनंतर चीनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “भारताची कारवाई दुर्दैवी आहे आणि आम्ही या संपूर्ण परिस्थितीबद्दल चिंतित आहोत.”
चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत पुढे म्हटलं की,“भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी आहेत, आणि ते दोघेही चीनचे शेजारी आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. पण त्याच वेळी, आम्ही दोन्ही बाजूंनी शांतता आणि स्थैर्याच्या व्यापक हितासाठी संयम बाळगावा अशी अपेक्षा करत असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले.
advertisement
भारताने मंगळवारी रात्री उशिरा पीओके आणि पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर अचूक हल्ले केले. या पार्श्वभूमीवर चीनची ही प्रतिक्रिया दक्षिण आशियातील बदलत्या सामरिक समीकरणात विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
मराठी बातम्या/देश/
China On Operation Sindoor : 'आम्ही दहशतवादाविरोधात पण...', चीनची भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement