Supreme Court : ''तुम्ही मंत्री आहात म्हणून...'' सरन्यायाधीश गवईंनी मंत्री शाह यांना सुनावलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Supreme Court : गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकतो, असा थेट सवाल केला.
नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना फटकारले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकतो, असा थेट सवाल केला. सुप्रीम कोर्टाने शाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यावर स्थगिती देण्यास नकार दिला.
विजय शाह यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि एफआयआरला स्थगिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. सरन्यायाधीश म्हणाले की, आम्हाला माहित आहे की तुम्ही फक्त मंत्री आहात म्हणून काहीही होणार नाही, परंतु या पदावर असल्याने तुम्ही जबाबदारीने विधाने करावीत.
'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृ्त्तानुसार, मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावतीने अॅड. विभा दत्ता मखीजा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, 'याचिकाकर्त्याने आपली चूक मान्य केली आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. माध्यमांनी ते अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सादर केले. आम्ही एफआयआरला स्थगिती देण्याची विनंती करत असल्याचे सांगितले.
advertisement
मंत्री विजय शाह यांनी कर्नल शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि डीजीपींना विजय शाह यांच्याविरुद्ध 4 तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी संध्याकाळी विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला, ज्याला विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
advertisement
ऑपरेशन सिंदूरची ब्रिफिंग करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धाडस आणि बहाद्दुरीला संपूर्ण समाज मन सॅल्युट करत आहे. पण कॅबिनेट मंत्री विजय शाह हे त्याला अपवाद ठरले. इंदुर इथं रायकुंडा गावामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात विजय शाह यांची जीभ घसरली. शाह यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 15, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
Supreme Court : ''तुम्ही मंत्री आहात म्हणून...'' सरन्यायाधीश गवईंनी मंत्री शाह यांना सुनावलं