West Bengal : मंत्री मलिक यांना ईडीकडून अटक, ममता बॅनर्जींना मोठा धक्का

Last Updated:

ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या राशन वितरण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी मलिक यांच्या काही ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले.

News18
News18
कोलकाता, 27 ऑक्टोबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने राशन घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या वन मंत्र्यांना अटक केलीय. ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्य मंत्री आहेत. ईडीने काल दिवसभर त्यांची चौकशी केली. यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ईडीने अटक केली. अटकेआधी मलिक यांनी म्हटलं होतं की, मी एका गंभीर षडयंत्राची शिकार आहे. मी इतकंच बोलू शकतो.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या राशन वितरण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी मलिक यांच्या काही ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक भागात वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला. तर ईडीच्या छाप्याबाबत बोलताना तृणमूल काँग्रेसने हे बदल्याचं राजकारण असून यापेक्षा काही वेगळं नाही असं म्हटलंय.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिक यांच्या माजी स्वीय सहायकाच्या घरासह इतर ८ ठिकाणी छापा टाकला गेला. केंद्रीय तपास यंत्रणेनं याआधी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याचे तृणमूल काँग्रेस, मलिक यांच्याशी जवळचे संबंध आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी संबंधाबाबत मलिक यांची चौकशी केली जात आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांचाही तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/देश/
West Bengal : मंत्री मलिक यांना ईडीकडून अटक, ममता बॅनर्जींना मोठा धक्का
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement