Aajache Rashibhavishy: पैसा तर बक्कळ मिळेल, पण आज आराम गरजेचा, मेष ते मीन आजच्या राशीभविष्यात काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आजचा शुक्रवार काही राशींसाठी अत्यंत लाभदायी असणार आहे. तर काही राशींसाठी मात्र नवी आव्हाने असतील. तुमच्या राशीभविष्यात काय लिहिलंय? जाणून घेऊ.
मेष राशी -मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
वृषभ राशी -इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरघोस नफा मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी -प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
सिंह राशी -भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. तुमची आर्थिक स्थिती ही बिघडते पण घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुम्हाला जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार.
advertisement
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
धनु राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून आज चांगली बातमी मिळणार. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
मीन राशी - कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. चंद्र देवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की, आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement