Scooter: लेकीला कॉलेजसाठी आताच घेऊन टाका स्कुटर, मायलेज 68 किमी, वजनानेही हलकी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुमचं बजेट एक लाख रुपये असेल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम मायलेज आणि चांगल्या फिचर्सची स्कुटरसह दारात उभी करता येईल.
भारतात सध्या स्कूटर खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा कल वाढला आहे. एकदा स्कुटर घेतली तर घरातील सगळेच ती वापरू शकतात. त्यामुळे स्कुटरमध्ये सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध आहे. जर तुमचं बजेट एक लाख रुपये असेल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम मायलेज आणि चांगल्या फिचर्सची स्कुटरसह दारात उभी करता येईल.
advertisement
Honda Activa 6G - भारतात सध्या होंडा कंपनीचा स्कुटर सेगमेंटमध्ये मोठा दबदबा आहे. होंडाची Honda Activa 6G ही सर्वात जास्त विक्री होणार स्कुटर आहे. या स्कूटरची किंमत 92,181 रुपये ते 98,731 रुपये एक्स शोरूम प्राइज इतकी आहे.या स्कूटरमध्ये 109.51सीसी इंजन दिलं आहे, जे 59.5 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देईल. या स्कूटरचा टॉप स्पीड 85 kmph आहे. या स्कूटरची बिल्ट क्वालिटी आणि कमी मेंटेनेंस इतर स्कुटरपेक्षा बेस्ट आहे.
advertisement
advertisement
Yamaha Fascino 125 - तरुणींमध्ये सध्या Yamaha Fascino 125 ही स्कुटर जास्त पसंत केली जात आहे. या स्कुटरची किंमत 99,969 रुपये ऑन रोड इतकी आहे. या स्कुटरमध्ये 125 सीसी इंजिन दिलं आहे. ही स्कूटर 68.75 kmpl इतका मायलेज देतेय. या स्कूटरचा टॉप स्पीड 90 kmph इतका आहे. या स्कुटरचं वजन कमी आहे, त्यामुळे तरुणी सहज हाताळू शकतात.
advertisement