EV Scooters: आता पेट्रोलच्या खर्चाला ब्रेक! 5 अशा EV गाड्या, रेंज पाहून लगेच कराल बूक!
- Published by:sachin Salve
Last Updated:
मध्यवर्गीय कुटुंबीयांना समोर ठेवून अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी चांगले पर्याय दिले आहे. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या काही इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकलींवर एक नजर टाकूया ज्यांची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
भारतात सध्या इंधनाचे दर कमालीचे वाढलेले आहे. तर दुसरीकडे प्रदुषणामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. अशातच तुम्हाला ईव्ही वाहनांचा मोठा पर्याय सध्या बाजारात उपलब्ध झाला आहे. एकापेक्षा एक बाइक, स्कुटर आणि कार मार्केटमध्ये लाँच झाल्या आहे. मध्यवर्गीय कुटुंबीयांना समोर ठेवून अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी चांगले पर्याय दिले आहे. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या काही इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकलींवर एक नजर टाकूया ज्यांची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
advertisement
Revolt RV1 Revolt RV1 ची किंमत ८४,९९० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये २.८ किलोवॅटची मोटर आणि २.२ किलोवॅटची बॅटरी आहे. ०-८०% चार्ज होण्यासाठी २ तास १५ मिनिटे लागतो असा दावा कंपनीने केला आहे. या बाइकची रेंज १०० किमी (IDC) आहे. बॅटरीची वॉरंटी पाच वर्षे किंवा ७५,००० किमी आहे.
advertisement
ओला रोडस्टर एक्स : ओला रोडस्टर एक्स ची किंमत ८४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलची बुकिंग सुरू असली तरी, ग्राहकांपर्यंत त्याची डिलिव्हरी मे २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. २.५ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असलेली ओला रोडस्टर एक्स ८४,९९९ रुपयांना (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर रेंज १४० किमी आहे. तुम्हाला ३.५ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह ओला रोडस्टर एक्स ९४,९९९ रुपयांना (एक्स-शोरूम) मिळू शकेल. या प्रकाराची रेंज १९६ किमी आहे.
advertisement
Honda QC1 : होंडा क्यूसी१ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ९०,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात १.८ किलोवॅटची मोटर आणि १.५ किलोवॅटची बॅटरी आहे. या स्कुटरची टॉप स्पीड ५० किमी प्रतितास आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ८० किमीचा रेंज असल्याचा दावा केला आहे. ०-८०% पर्यंत बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास ३० मिनिटे लागतात आणि ०-१००% पर्यंत बॅटरी चार्ज होण्यासाठी ६ तास ५० मिनिटे लागतात.
advertisement
TVS iQube : इलेक्ट्रिक २.२kWh बॅटरी असलेल्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी चालते. तर ०-८०% चार्जिंग वेळ २ तास ४५ मिनिटे आहे. ही स्कुटरसाठी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी.
advertisement
Bajaj Chetak : बजाज चेतकची सुरुवातीची किंमत 98,498 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कुटरमध्ये २.९ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी ०-८०% पर्यंत चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. या स्कुटरचा टॉप स्पीड ताशी ६३ किमी आहे तर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर रेंज १२३ किमी आहे असा दावा कंपनीने केला आहे. यात हिल होल्ड, सिक्वेंशियल ब्लिंकर्स, अॅप कनेक्टिव्हिटी आणि मल्टिपल राइड मोड्स (इको आणि स्पोर्ट) सारखे फिचर्स आहेत.