Windsor EV PRO: कार नव्हे चालता फिरता बंगला, MG Motor लाँच करतेय भारी SUV
- Published by:sachin Salve
Last Updated:
विशेष म्हणजे, ही गाडी फॅमिलीसाठी बेस्ट असा पर्याय आहे. कारमध्ये मिळणार स्पेस, कम्फर्ट आणि बॅटरीची रेंज ही या कारची जमेची बाजू आहे
JSW MG Motor ने भारतात आगळीवेगळी अशी windsor आणून मार्केटमध्ये एकच धुमाकूळ घातला होता. windsor EV ने भारतात सगळ्याच ईव्ही गाड्यांना मागे टाकून विक्रमी विक्री केली. विशेष म्हणजे, ही गाडी फॅमिलीसाठी बेस्ट असा पर्याय आहे. कारमध्ये मिळणार स्पेस, कम्फर्ट आणि बॅटरीची रेंज ही या कारची जमेची बाजू आहे. त्यामुळे अल्पवधीत लोकांची पसंतीला ही कार उतरली. आता windsor EV PRO मॉडेल लाँच होणार आहे.
advertisement
advertisement
ज्या लोकांना लांबपल्ल्याचा प्रवास करायचा आहे अशा लोकांना टार्गेट ठेवून Windsor Pro EV लाँच केली जाणार आहे. सध्याची windsor EV ही शहरात प्रवास करण्यासाठी परफेक्ट आहे. पण आता नवीन मॉडेलमध्ये ही कमी दूर केली जाणार आहे. यासोबत डिझाइनमध्ये बदल केले जाणार आहे. ही पहिली अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे जी बिझनेस क्लास सारखे केबिन आणि स्पेस देतेय. प्रत्येक महिन्याला या कारची विक्री वाढत चालली आहे. ही कार बॅटरीसह आणि विना बॅटरी अशा ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
काय असणार आहे नवीन Windsor PRO मध्ये? नवीन Windsor PRO मध्ये G-Jio इनोव्हेटिव्ह कनेक्टिविटी प्लॅटफॉर्मचं अपग्रेड मिळणार आहे. ज्यामध्ये 100+ AI-पावर्ड व्हाईस कमान्ड्स आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन असेल. सेफ्टीसाठी या EV मध्ये 6 एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, आणि ESC सारखे फिचर्स दिले जाणार आहे.
advertisement
नवीन Windsor PRO मध्ये पहिल्या कारपेक्षा जास्त फिचर्स दिले जाणार आहे. यामध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, अपग्रेडेड 15.6-इंच ग्रँडव्हू टच डिस्प्ले असणार आहे. रिअर सीट्ससह रिक्लाइन फिचर्स आणि 604-लीटर बूट स्पेस सुद्धा मिळणार आहे. यासोबतच वायरलेस चार्जिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे फिचर्स मिळणार आहे.
advertisement