फॉर्च्युनर सुद्धा दिसेल छोटी, Tata आणतेय सगळ्यात दमदार आणि मजबूत अशी SUV, या दिवशी होणार लाँच
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता सियारा नव्या रुपात आणि नव्या ढंगात परत येत आहे. नव्या Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच केलं जाणार आहे, अखेर या कारच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे.
90 च्या दशकामध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांचा चांगलाच दबदबा होता. भारतीय कंपन्यांचा तो सुवर्ण आणि लढवय्या काळ होता. वेगवेगळे प्रयोग करून दमदार अशा गाड्यांचं उत्पादन केलं जात होतं. टाटा मोटर्सने भारतीयांना त्या काळात अनेक अशा आठवणी दिल्या. त्यातील एक होती. Sierra. सियारा त्यावेळी लक्झरी एसयूव्ही म्हणून ओळखली जात होती. आता सियारा नव्या रुपात आणि नव्या ढंगात परत येत आहे. नव्या Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच केलं जाणार आहे, अखेर या कारच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे.
advertisement
Tata Sierra ची पहिली झलक ही दिल्लीच्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे Tata Sierra आधी मे महिन्यात लाँच होईल असं सांगितलं जात होतं. पण आता ही गाडी ऑगस्ट महिन्यात लाँच होईल अशी माहिती समोर आली आहे. ही नवी सियारा ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफ़ॉर्मवर तयार केली आहे. पण सियाराच्या लाँचिंग लांबलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement