maruti ertiga सारखीच दिसायला सेम, toyota ची दुसरी मिनी innova, पण मायलेज किंग कोण?
- Published by:sachin Salve
Last Updated:
Ertiga ने सर्वाधिक विक्रीचा आणि फॅमिली कार म्हणून बहुमान मिळवला. पण याच Ertiga ची सेम दिसणारी ७ सीटर कार सध्या मार्केटमध्ये आहे. तिला पाहून अनेक जणांना विश्वास बसत नाही.
सध्या प्रत्येक जण एखादी कार खरेदी करण्याआधी आपली फॅमिलीचा विचार करूनच निवड करत आहे. खास करून मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये 7 सीटर एमपीव्हीचा वापर वाढला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मारुतीच्या Ertiga ने सर्वाधिक विक्रीचा आणि फॅमिली कार म्हणून बहुमान मिळवला. पण याच Ertiga ची सेम दिसणारी ७ सीटर कार सध्या मार्केटमध्ये आहे. तिला पाहून अनेक जणांना विश्वास बसत नाही.
advertisement
Ertiga सारखी दिसणारी कार ही टोयोटा कंपनीने अलीकडेच लाँच केली होती. या एमपीव्हीचं नाव टोयोटा कंपनीने Toyota Rumion असं ठेवलं होतं. पेट्रोल आणि सीएनजी ऑप्शनमध्ये ही MPV उपलब्ध आहे. Rumion मुळात ही एर्टिगाच्याच प्लॅटफॉर्मवर उभी आहे. नेक्साने या कारची निर्मिती केली. अंतर्गत करारामुळे टोयोटा हा मारुती सुझुकीला मदत करतोय. हायब्रिड इंजिन असेल किंवा कारचे पार्ट असेल तर टोयोटा ही मारुतीला पुरवत असते. त्याचाच एक भाग म्हणून टोयोटाने मारुतीची बेस्ट सेलर Ertiga ची कॉपी केली आणि Rumion लाँच केली.
advertisement
Rumion मध्ये सहा एअरबॅग्ज आहेत. या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, टोयोटा आय-कनेक्ट टेक्नॉलॉजी, सात इंच आकाराची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस अ‍ॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि हाइट अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट अशी वैविध्यपूर्ण आणि आधुनिक फीचर्स आहेत. त्यामुळे कारची उपयुक्तता अधिक वाढणार आहे. खासकरून उंची अ‍ॅडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट असल्यामुळे अनेकांना उपयोगाची ठरणार आहे.
advertisement
Toyota Rumion: टोयोटाने Rumion सेम एर्टिगा सारखेच 7 सीटर दिले आहे. या गाडीची किंमत 10 लाख 54 हजार रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते, टॉप एन्ड मॉडेल 13 लाख 83 हजार रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. Rumion ही सीएनजी व्हेरिएंमध्येही उपलब्ध आहे. हायवेवरही ही गाडी 26.1 किलोमीटर इतका मायलेज देते. दुसरीकडे टोयोटा रुमियन पेट्रोल व्हेरिएंट मॉडेल हे 20.11 किलोमीटर ते 20.51 किलोमीटर इतकं मायलेज देतेय.
advertisement
Maruti Suzuki Ertiga: मारुती सुझुकीची ही लोकप्रिय ७ सीटर कार आहे. या कारची बेस मॉडेलची किंमत 8 लाख 96 हजार 500 रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. पण जर टॉप मॉडेल घ्यायचं ठरलं तर 13 लाख 25 हजार रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत आहे. ही कार 20.51 किलोमीटर, पेट्रोल (ऑटोमॅटिक) वर 20.30 किलोमीटर आणि सीएनजी (म्यॅनुअल) वर 26.11 किलोमीटर इतकं मायलेज देते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे इंजिन 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह येते.
advertisement
मारुती सुझुकी एर्टिगाच्या स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचे झाल्यास, ही कार मार्केटमधील सर्वोत्तम MPV मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 101.64 bhp च्या कमाल पॉवरसह 136.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच यात मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शनही आहे. कंपनीच्या मते, ही कार 20.51 किमी प्रति लीटर मायलेज देखील देते.