एक फोन कॉल अन् बर्थडे टाकून अलिबागहून मुंबईला परतले आलिया-रणबीर, असं झालं काय?

Last Updated:
alia bhatt nad ranbir kapoor returned to mumbai : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आलिबागमध्ये वाढदिवस आणि होळी साजरी करत होते. मात्र एका फोन कॉलनंतर दोघांनी सेलिब्रेशन थांबवून तातडीने मुंबईला परत येण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय झालं?
1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या प्राधान्यामुळेही चर्चेत असतात.

advertisement
2/10
नुकतीच आलिया भट्टचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि होळीच्या रंगात रंगण्यासाठी रणबीरबरोबर अलिबागला गेली होती.

3/10
मात्र, एका फोन कॉलने या सेलिब्रेशनमध्ये अचानक खंड पडला आणि दोघांनीही मुंबईकडे परतीचा प्रवास केला.

4/10
ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील आणि ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर देब मुखर्जी यांचे मुंबईत दुःखद निधन झाले. हा धक्कादायक फोन कॉल आलिया आणि रणबीरला मिळताच, त्यांनी सेलिब्रेशन थांबवून तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.

5/10
देब मुखर्जी हे हिंदी सिनेसृष्टीतील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली असून, त्यांच्या कुटुंबाचा सिनेसृष्टीत मोठा वारसा आहे.

6/10
आलिया आणि रणबीरने अलिबागमध्ये खासगी व्हिलामध्ये होळी आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू केले होते. कुटुंबातील काही सदस्य आणि मित्रमंडळीही त्यांच्यासोबत होते. मात्र, दुःखद बातमी समजताच, दोघांनी कोणताही विलंब न लावता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.

7/10
रणबीर आणि आलिया हे फक्त उत्तम कलाकारच नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठी नेहमीच हजर असणारे जबाबदार सदस्यही आहेत. अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांची मैत्री ‘वेक अप सिड’पासून सुरु झाली असून, त्यांनी ब्रह्मास्त्रमध्येही एकत्र काम केले आहे.

8/10
 अयान आणि रणबीर यांच्यात केवळ दिग्दर्शक-अभिनेता असे संबंध नाहीत, तर ते जवळचे मित्र आहेत. त्यामुळे अयानच्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर रणबीर आणि आलियाने त्याच्या कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचे समजले.

9/10
देब मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार, दिग्दर्शक, आणि निर्माते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचे कळते. रणबीर आणि आलिया यांनीही श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवला.

10/10
रणबीर आणि आलियाने अयान मुखर्जीच्या घरी जाऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला रणबीर कपूरने खांदा दिला.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement