'डोनाल्ड ट्रम्पमुळे आमच्या घरात भांडणं...', सनी लिओनीने काढला मनातला राग, सांगितला कॅलिफोर्नियातला 'तो' किस्सा

Last Updated:
Donald Trump Politics : बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीने ट्रम्प यांच्या राजकारणावर आपले मत मांडले आहे. तिने ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली.
1/6
मुंबई : सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले नाहीत, आणि याला कारण आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

advertisement
2/6
याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सनी लिओनीने एका मुलाखतीत ट्रम्प यांच्या राजकारणावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे, जे खूप चर्चेत आहे. सनी लिओनीने मुलाखतीत सांगितलं की, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काही गोष्टी मला आवडतात, पण काही गोष्टी अशा आहेत की मला वाटतं,
याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सनी लिओनीने एका मुलाखतीत ट्रम्प यांच्या राजकारणावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे, जे खूप चर्चेत आहे. सनी लिओनीने मुलाखतीत सांगितलं की, 'डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काही गोष्टी मला आवडतात, पण काही गोष्टी अशा आहेत की मला वाटतं, "हे देवा, आता तरी बोलणं बंद करा!"'
advertisement
3/6
ती म्हणाली की, 'कोविडच्या काळात जेव्हा मी कॅलिफोर्नियात राहत होते, तेव्हा तिथे ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण होतं. आमच्या घरात एक नियम होता की, जेव्हाही आम्ही मित्रमंडळींना बोलावू, तेव्हा राजकारणावर बोलायचं नाही. कारण राजकारणावर चर्चा सुरू झाली की मैत्री धोक्यात येते.'

4/6
सनीने पुढे सांगितलं की, 'आजकाल असा काळ आहे की, लोकांना एकतर ट्रम्प खूप आवडतात किंवा ते त्यांचा खूप द्वेष करतात. मध्ये कोणताही मार्ग उरलेला नाही.'

5/6
ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल बोलताना सनीने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, 'मला वाटतं, त्यांची काही धोरणं अर्थव्यवस्था वाढवू शकतील. पण त्याची किंमत काय असेल? मला असं वाटतं की, जे काही होत आहे, त्यात काही गोष्टी उगाचच आहेत, तर काही गोष्टी अगदी योग्य आहेत.'

6/6
सनीने या मुलाखतीमध्ये कोणताही थेट राजकीय पक्ष किंवा नेत्याचं नाव न घेता, एक सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आपलं मत मांडलं आहे. ती शेवटी म्हणाली की, 'मी फक्त एवढीच आशा करते की, आपण पुन्हा त्या काळात परत जाऊ, जिथे आपण आपल्या नेत्यांवर प्रेम करू.'

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement