सुपरस्टाच्या मुलाची निघणार होती वरात, पण निघाली अंत्ययात्रा, सिनेमाने संपवलं अभिनेत्याचं आयुष्य

Last Updated:
Brandon Lee Death : एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, जो स्वतःही मोठं नाव कमावण्याच्या प्रयत्नात होता, त्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी होता.
1/5
हॉलीवूडच्या एका शूटिंग सेटवरील एक सामान्य दिवस, पण तो दिवस एका कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, जो स्वतःही मोठं नाव कमावण्याच्या प्रयत्नात होता, त्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी होता. आणि हे कुठलंही सिनेमाचं कथानक नव्हे, तर ही खरी घटना आहे, ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले.

advertisement
2/5
ब्रूस ली हे नाव फक्त चायनीज सिनेमापुरतं नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनातही खोलवर कोरलं गेलंय. पण ब्रूस लीच्या आयुष्यात सर्वात मोठा आघात झाला तो त्याच्या मुलाच्या अचानक निधनामुळे. ब्रँडन ली, ज्याचं वय फक्त २८ वर्षं होतं, तो आपल्या 'The Crow' या चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्याच्यासोबत धक्कादायक घटना घडली.

3/5
त्या दिवशी एक महत्त्वाचा सीन शूट केला जाणार होता, जिथे ब्रँडनला गोळी लागते. हा फक्त एक स्टंट होता, असं सगळ्यांना वाटत होतं. गनमध्ये असलेल्या खऱ्या गोळ्या आधी काढून मग नकली गोळ्या टाकण्याची जबाबदारी होती. पण एका क्षणाचं दुर्लक्ष… आणि ब्रँडन खऱ्याखुऱ्या गोळीने जखमी झाला. त्याच्या सहकलाकाराने चुकून त्याला खरी गोळी मारली आणि ब्रँडन जागीच कोसळला.

4/5
शूटिंग संपलं, सिनेमा थांबला, पण एक आयुष्यही कायमचं थांबलं. ३१ मार्च १९९३ रोजी ब्रँडन लीने अखेरचा श्वास घेतला. आणि दुर्दैव म्हणजे त्याच्या लग्नाला फक्त १७ दिवस उरले होते. त्याची होणारी पत्नी रेनी हारलीनची पर्सनल असिस्टंट होती, दोघांनी साखरपुडा केला होता पण नियतीची क्रूर खेळी दोघांनाही वेगळं करून गेली.

5/5
सर्वात धक्कादायक म्हणजे, ब्रँडनच्या वडिलांचं म्हणजेच ब्रूस लीचं निधनही वयाच्या फक्त ३२व्या वर्षी झालं होतं. म्हणजे बाप आणि मुलगा, दोघांनीही त्यांच्या यशाच्या टोकावर असताना जीव गमावला.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement