YouTuber Shirish Gavas Death : IT ची नोकरी गेली, थेट कोकणात येऊन सुरू केली 'रेड सॉइल स्टोरीज', कसा होता शिरीष गवसचा प्रवास?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
YouTubeer Shirish Gavas Death : कोकणातील प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर शिरिष गवसचे ३३ व्या वर्षी निधन झाले आहे. तो रेड सॉइल स्टोरीज यूट्यूब चॅनलचे निर्माता होता.
कोकणातील प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर आणि रेड सॉइल स्टोरीज या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा निर्माता शिरीष गवस यांचं अवघ्या ३३ व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंकिता वालावलकरने ही धक्कादायक माहिती दिली आहे. तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
advertisement
शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी आपल्या नोकऱ्या सोडून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांनी एका दिवसात घेतलेला नाही. यामागे त्यांचे अथक परिश्रम आणि खोल अभ्यास होता.
advertisement
शिरीष हा मुंबईतील एका आयटी कंपनीत काम करत होता आणि पूजा सिनेसृष्टीत फिल्म मेकिंग क्षेत्रात उत्तम काम करत होती. मात्र कोरोनामध्ये त्यांना फटका बसला. शिरीषची नोकरी गेली आणि इंडस्ट्री बंद असल्याने पूजालाही काम करता येत नव्हते. अशा परिस्थितीत गप्प न बसता, त्यांनी थेट आपलं गाव गाठलं.
advertisement
दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मिळालेला वेळ त्यांनी सत्कारणी लावला. त्यांनी गावातील जीवनशैली, तिथली खाद्यसंस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमतीजमती जगासमोर आणायचे ठरवले. इथूनच त्यांच्या युट्यूब चॅनेलचा जन्म झाला. गवस दाम्पत्याने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या.
advertisement
शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी करोनानंतर युट्यूबवर Red Soil Stories हे चॅनेल सुरू केले. सध्या त्यांच्या चॅनेलचे ४ लाख २७ हजार सबस्क्रायबर्स असून या जोडप्याने आतापर्यंत १६१ व्हिडीओ तयार करून अपलोड केलेले आहेत. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष गेल्या काही दिवसांपासून मेंदूशी निगडित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडीओही रेड सॉइल स्टोरीजवर शेअर केलेला होता.
advertisement