Shahrukh Khan : शाहरुखनं बदललं सगळं गणित, टॉम क्रूझही मागे पडला; हॉलीवूड स्टार्स शॉकमध्ये!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shahrukh Khan : जगप्रसिद्ध Esquire मासिकाने नुकतीच प्रसिद्ध केलेली 'जगातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्यांची यादी' शाहरुखने गाजवली असून, त्याचा समावेश थेट टॉप पाच श्रीमंत अभिनेत्यांमध्ये झाला आहे.
बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. जगप्रसिद्ध Esquire मासिकाने नुकतीच प्रसिद्ध केलेली 'जगातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्यांची यादी' शाहरुखने गाजवली असून, त्याचा समावेश थेट टॉप पाच श्रीमंत अभिनेत्यांमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत शाहरुख अनेक हॉलीवूड स्टार्सलाही मागे टाकत पुढे झळकला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शाहरुख खान केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही बॉलीवूडचं प्रतिनिधित्व करत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची ओळख "द फेस ऑफ बॉलिवूड" म्हणून आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ तो भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे आणि त्याचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देशांमध्येही आहेत. मात्र, शाहरुख खान केवळ एक अभिनेता नाही, तर एक यशस्वी उद्योजक, जागतिक आयकॉन आणि खर्या अर्थाने बॉलीवूडचा बादशाह आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement