'गुपचूप पैसे द्यायची, नवीन कपडे आणायची', 'त्या' व्यक्तीच्या जाण्याने पूर्णपणे कोसळला होता हार्दिक जोशी, शो सोडायला झाला तयार

Last Updated:
Hardeek Joshi : नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिक जोशीने आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा तो खूप भावूक झाला.
1/8
मुंबई: 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'राणादा' म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आपल्या रांगड्या आणि प्रेमळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण, या यशामागे आणि करिअरमध्ये खंबीरपणे उभे राहण्यामागे त्याच्या वहिनीचा सर्वात मोठा हात होता.

advertisement
2/8
काही महिन्यांपूर्वीच त्याच्या लाडक्या वहिनीचे निधन झाले. नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिक जोशीने आपल्या वहिनीच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा तो खूप भावूक झाला.
काही महिन्यांपूर्वीच त्याच्या लाडक्या वहिनीचे निधन झाले. नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिक जोशीने आपल्या वहिनीच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा तो खूप भावूक झाला.
advertisement
3/8
कविरत स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक जोशी म्हणाला की, माझ्या या कलाविश्वातील प्रवासात माझ्या वहिनीने सर्वाधिक पाठिंबा दिला.
कविरत स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक जोशी म्हणाला की, माझ्या या कलाविश्वातील प्रवासात माझ्या वहिनीने सर्वाधिक पाठिंबा दिला. "मी जेव्हा स्ट्रगल करत होतो, तेव्हा मला खूप कमी पैसे मिळायचे. मी छोटे रोल्स करत होतो आणि नोकरीच्या शोधात होतो."
advertisement
4/8
त्या कठीण काळात हार्दिकच्या वहिनीने त्याला मोठा आधार दिला. त्या हार्दिकला म्हणाल्या,
त्या कठीण काळात हार्दिकच्या वहिनीने त्याला मोठा आधार दिला. त्या हार्दिकला म्हणाल्या, "तुला नाही करायचीये ना नोकरी? मग नको करूस. तू तुझं स्वप्न पूर्ण कर, स्ट्रगल कर. आम्ही आहोत सपोर्टला. एक दिवस याच क्षेत्रात तुला यश मिळेल."
advertisement
5/8
 "ती मला नेहमी गुपचूप पैसे द्यायची. जेव्हा कधी ती शॉपिंगला जायची, तेव्हा माझ्यासाठी आठवणीने कपडे घ्यायची. माझ्यासाठी ती एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम होती," असे सांगताना हार्दिकचा कंठ दाटून आला.

6/8
हार्दिक जोशीने 'जाऊ बाई गावात' या शोमधील एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला.
हार्दिक जोशीने 'जाऊ बाई गावात' या शोमधील एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. "मी खरं तर तो शो सोडलाच होता. प्रोमो आऊट झाला, त्याच दिवशी कळले की वहिनीची तब्येत खूप सीरियस आहे." भावाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यासाठी हार्दिकने काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि तसं झी मराठीच्या क्रिएटिव्ह टीमला सांगितले.
advertisement
7/8
जेव्हा वहिनीला कळले की हार्दिक शो सोडत आहे, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेतच तिने त्याला बजावलं.
जेव्हा वहिनीला कळले की हार्दिक शो सोडत आहे, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेतच तिने त्याला बजावलं. "तिने हाताच्या खुणेने मला तो शो सोडू नकोस, असे सांगितले आणि माझ्याकडून प्रॉमिस घेतले." हार्दिक भावूक होऊन म्हणाला, "माझा शो आला, तो यशस्वीही झाला, पण तो बघायला ती नव्हती."
advertisement
8/8
हार्दिक म्हणाला, त्याची वहिनी आजारी असताना त्याची पत्नी अक्षया देवधर हिने एकही मालिका स्वीकारली नाही. तिला अनेक ऑफर्स येत होत्या, पण तिने घरात सगळ्यांना आधार देण्यासाठी काम करणे टाळले.
हार्दिक म्हणाला, त्याची वहिनी आजारी असताना त्याची पत्नी अक्षया देवधर हिने एकही मालिका स्वीकारली नाही. तिला अनेक ऑफर्स येत होत्या, पण तिने घरात सगळ्यांना आधार देण्यासाठी काम करणे टाळले.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement