Health Tips : चायनीजमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो आरोग्यासाठी चांगला की वाईट?

Last Updated:
चायनीज फूड हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. रस्त्यावर किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला चायनीज फूड सहज मिळू शकते. परंतु याच चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो हा आरोग्यासाठी कितपत चांगला आहे यावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तेव्हा अजिनोमोटो खर्च आरोग्यासाठी किती चांगला किंवा वाईट हे जाणून घेऊयात.
1/6
अजिनोमोटोचा वापर सर्वाधिक चायनीज पदार्थांमध्ये केला जातो. तसेच अनेकदा मॅगी मसाल्यातही त्याचा वापर केलेला पाहायला मिळतो तेव्हा अजिनोमोटो म्हणजे नक्की काय हे आधी जाणून घेऊयात. अजिनोमोटो हा मोनोसोडियम ग्लुटामेटचा एक प्रकार आहे, ज्याला एमएसजी असेही म्हणतात. हा पांढर्‍या रंगाचा स्फटिक मीठासारखा पदार्थ असून त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

advertisement
2/6
अजिनोमोटो कमी प्रमाणात वापरणे सुरक्षित आहे, कारण त्याचा जास्त वापर शरीरासाठी हानिकारक असू शकतो. ग्लूटामिक ऍसिड मेंदूमध्ये न्यूरोट्रांसमीटर म्हणून कार्य करते, त्यामुळे अजिनोमोटो हानिकारक आहे असे अनेक लोक मानतात. कारण ग्लूटामेट तुमच्या शरीरासाठी विषारी असण्याचा धोका असतो यामुळे पेशी कमी होवू शकते.तेव्हा अजिनोमोटो पदार्थाची चव वाढवण्यासाठी चांगला असला तरी त्याचा वापर हा कमी प्रमाणात करावा असे आरोग्यतज्ञ सांगतात.

3/6
अजिनोमोटोच्या पौष्टिक मूल्याचा विचार केला तर या पदार्थाच्या 1000 ग्रॅममध्ये 12,300 मिलीग्राम सोडियम, 21.2 मिलीग्राम कॅल्शियम आणि 0.4 मिलीग्राम लोह असते. तर यात कोणत्याही प्रकारचे जीवनसत्व नसते.

4/6
अजिनोमोटोचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढणे, मायग्रेन, स्नायू दुखणे, गर्भधारणेदरम्यान समस्या येणे अशा अनेक समस्या जाणवतात.

5/6
अजिनोमोटोमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने गरोदरपणात महिलांना यामुळे समस्या होऊ शकते. कारण गरोदरपणात महिलांना सोडियमचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात सोडीयमचे प्रमाण जास्त झाल्याने सूज, उच्च रक्तदाब आणि इतर समस्या उद्भवू शकतात.अजिनोमोटोचा मुलांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे गरोदर असताना अति प्रमाणात सेवन केल्यास गर्भपात होणे, गर्भाशयाची वाढ खुंटणे यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.

6/6
अजिनोमोटोमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात द्रव साठवून ठेवण्याची क्षमता वाढते आणि वजन वाढू लागते. यामुळे अनेकदा भरपूर फूड क्रेव्हिंग्स होतात ज्यामुळे जास्त खाल्ले जाते आणि त्यामुळे वजन वाढते.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement