Fruit Benefits in Winter: हिवाळ्यात फिट रहायचं आहे? मग खा ‘ही’ फळं; आजार पळतील दूर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Fruits to keep you healthy in Winter: उत्तर भारतासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली आलाय. अवकाळी पावसानंतर थंडीने नाही तर थेट कडाक्याच्या थंडीने पुनरागमन केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा साथीच्या आजारांची भीती वाढली आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फळं खाणं फायद्याचं ठरतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती फळं खाल्ल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो.
advertisement
advertisement
स्ट्रॉबेरी हे हिवाळ्यात येणारं आणि सगळ्यांना आवडणारं फळ आहे. अनेक जण स्ट्रॉबेरीच्या सीझनसाठी हिवाळ्याची वाट बघतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्ट्रॉबेरीत व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फोलेट, मँगनीज, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय स्ट्रॉबेरीजचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीसचे रूग्णही स्ट्रॉबेरी खाऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement