Winter Tips for Back Pain: हिवाळ्यात होतोय सांधेदुखीचा त्रास? वापरा ‘या’ टिप्स, सांधेदुखी जाईल पळून

Last Updated:
Home Remedies for Back Pain: गुलाबी थंडीमुळे अनेकांना हिवाळा हवाहवासा वाटतो. मात्र जेव्हा गुलाबी थंडीचं रूपांतर कडाक्याच्या थंडीत होतं तेव्हा अनेक आजारांना सुरूवात होते. ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं रक्षण करता करता सुरू होतो तो सांधेदुखीचा त्रास.मान, कंबर, गुडगे दुखण्याच्या तक्रारी हिवाळ्यात नित्याच्याच झाल्यात. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणते साधे घरगुती उपाय केल्याने तुम्ही सांधेदुखी आणि कंबरदुखीपासून स्वत:चं रक्षण करू शकता.
1/7
सतत लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने सांधे अखडू शकतात. हिवाळ्यात असं करणं तर फार धोक्याचं आहे. त्यामुळे ठराविक अंतराने कामातून ब्रेक घ्या. घरातल्या घरात चालल्याने स्नायूंना येणारा ताठरपणा टाळता येतो.

advertisement
2/7
हिवाळ्यात पायांना वळ येणं किंवा कंबर आणि पोटऱ्या दुखणं हा एक सामान्य आजार आहे. गोळ्या औषधांनी तुम्हाला तात्पुरता फरक पडू शकतो. मात्र अशा वेळी गरम पाण्याने शेकल्यास शरीराला जास्त लवकर आराम मिळू शकतो.

3/7
थंडीच्या वातावरणात शरीर सक्रिय ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे रोज व्यायाम करावा. जर तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल तर घरातल्या घरात योगासने किंवा चालण्याचा व्यायाम करा.

4/7
हिवाळ्यात गुडघे दुखण्याचा त्रास वाढतो. गुडघ्यांना आराम मिळण्यासाठी हलक्या गरम तेलाने मसाज केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी तुम्ही खोबरेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता.

5/7
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत व्हायला मदत होईल शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढेल.

6/7
पाठदुखी किंवा कंबरदुखीसाठी महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या बसण्याची पद्धत. तुम्हाला जर चुकीच्या पद्धतीने बसण्याची सवय असेल तर स्नायू अखडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही खुर्ची, सोफा किंवा जमिनीवर कुठेही बसा तुम्हाला योग्यस्थितीत बसण्याची सवय असेल तर त्रास होणार नाही.

7/7
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम तर मिळतोच पण स्नायूंचा कडकपणाही कमी होतो.याशिवाय अंघोळीच्या पाण्यात मीठ घालून अंघोळ केल्याने थकवा दूर व्हायला मदत होते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement